२५ ऑगस्ट २०१९

🌴सुवर्ण'सिंधू'; जागतिक स्पर्धेत जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय

👉भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली.

👉जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला.

👉तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले.

👉जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

👉या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली.

👉या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.

🌹🌳🌴वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदकविजेते भारतीय🌴🌳🌹

👉1983 - प्रकाश पादुकोण ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक

👉2011 - ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा ( महिला दुहेरी) - कांस्यपदक

👉2013 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक

👉2014 -   पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक

👉2015 - सायना नेहवाल ( महिला एकेरी) - रौप्यपदक

👉2017 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक

👉2017- सायना नेहवाल ( महिला एकेरी) - कांस्यपदक

👉2018 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक

👉2019 - बी साई प्रणित ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...