Monday, 31 January 2022

महाष्ट्रातील समाज सुधारक :- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

🔘 जीवन परिचय 🔘

◼️महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर पुढे मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर रानडे यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात  दाखल केले.

◼️१८६४ मध्ये इतिहास हा विषय घेऊन एम ए ची पदवी त्यांनी संपादन केली. १८६६ मध्ये  कायद्याची परीक्षा पास झाले. विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो  म्हणून रानडे यांची निवड झाली होती.

◼️१८६८ मध्ये त्यांची मुंबई येथे एल्फिन्स्टन कॉलेजात इग्रजी व इतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.

◼️मुंबई इलाख्याचा गवर्नर रे याने १८८५ रानडे यांची कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले.

◼️१८९३ मध्ये मुंबई उच्च न्यायालायचे न्यायाधीश म्हणून नेमणूक आली.

◼️सन १८८५ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे एक संस्थापक म्हणूनही रानडे याचा उल्लेख केला जातो.

🔘 प्रार्थना समाज 🔘

◼️३१ मार्च १८६७ रोजी आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, डॉ भांडारकर वामन  मोडक, या सर्वांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

🔘प्रार्थना समाजाची  तत्त्वे 🔘

◼️ईश्वर एकाच आहे तो निराकार आहे व तोच या विश्वाचा निर्माता आहे.  

◼️सत्य, सदाचार, भक्ती हे ईश्वराचे उपासक आहेत.  

◼️पठ्नेच्या मार्गाने ईश्वराची उपासना येते पण भौतिक फळाची नाही.  

◼️प्रार्थना ही फक्त आत्मिक उन्नातीशिवाय करावयाची असते. 

◼️मूर्तीपूजा हा परमेश्वराच्या उपासनेचा त्यज्य मार्ग आहे. 

◼️सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून सर्वांनी बंधू  राहावे.

🔘सार्वजनिक सभा🔘

◼️सार्वजनिक सभेची स्थापना २ एप्रिल १८७० रोजी पुणे येथे झाली. १८७१ पासून  काकाच्या मदतीने तिला राजकीय स्वरूप प्राप्त झाले.

🔘 भारतीय सामाजिक परिषद 🔘

◼️सामाजिक सुधारणेचा मार्ग म्हणून रानडे यांनी सामाजिक परिषद ची सथापना केली.  १८८७ मध्ये कॉंग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनात सामाजिक परिषद भरविण्यात आली.

◼️मुंबईत १८६५ मध्ये स्थापन झालेल्या विधवाविवाह उत्तेजक मंडळाचे ते एक प्रमुख सभासद होते. 

◼️मराठी सत्तेचा  हा ग्रंथ लिहून विश्लेषणात्मक दृष्टीचा प्रत्यय आणून दिला आहे. १६ जानेवारी १९०१ रोजी मुंबई येथे निधन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...