Thursday, 22 August 2019

झांबिया आणि भारत  या देशांच्या दरम्यान सहा  करार झाले


झांबियाचे राष्ट्राध्यक्ष एडगर चागवा लुंगु यांनी 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2019 या काळात भारताला भेट दिली. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर भारत दौऱ्यावर आलेले ते आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.

👉राष्ट्राध्यक्ष लुंगु यांचा हा पहिलाच भारत दौरा होता.

👉भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष लुंगु आणि त्यांच्या समवेत आलेल्या प्रतिनिधी मंडळासोबत झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

🌹🌳🌴चर्चेमधले ठळक मुद्दे🌴🌹

👉भारताच्या सहकार्यात आरोग्य, ऊर्जा निर्मिती तसेच ल्युसाकामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भातल्या प्रकल्पात उत्तम प्रगती होत आहे.

👉झांबियामध्ये इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी भारत सहकार्य करणार आहे. 

👉याशिवाय कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी 100 सौर सिंचन पंप भारत उपलब्ध करुन देणार आहे. झांबियाला 1000 टन तांदूळ आणि 100 टन दूध भुकटीही भारत पाठविणार आहे.

🌹🌳🌴झांबिया आणि भारत  यांच्यात झालेले करार 🌴🌳🌹

1.भूगर्भ आणि खनिज संसाधन या क्षेत्रातल्या सहकार्याबाबतचा सामंजस्य करार

2.संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार

3.कला आणि संस्कृती क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

4.भारतीय परराष्ट्र व्यवहार सेवा आणि झांबियामधली राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्था यामधला सामंजस्य करार  

5.ई-विद्याभारती आणि ई-आरोग्यभारती (e-VBAB) नेटवर्क प्रकल्पाबाबत सामंजस्य करार

6..भारतामधले निवडणूक आयोग आणि झांबियामधले निवडणूक आयोग यांच्यादरम्यानचा सामंजस्य करार

🌹🌳🌴भारत-झांबिया संबंध🌴🌳🌹

👉झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातला एक भूपरिवेष्ठित देश आहे.

👉त्याला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, टांझानिया, मलावी, मोझांबिक, झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया आणि अँगोला या देशांचा वेढा आहे.

👉लुसाका ही झांबियाची राजधानी असून झांबियाई क्वाचा हे राष्ट्रीय चलन आहे.

👉भारत आणि झांबिया यांच्यात प्राचीन काळापासून संबंध आहेत.

👉झांबिया हा भारताचा महत्वाचा मित्र आणि विश्वासू भागीदार आहे.

👉व्यापार, वाणिज्य, गुंतवणूक आणि पायाभूत संरचनेपासून विकासात्मक सहकार्य, क्षमतावृद्धी तसेच दृढ सांस्कृतिक संबंधांपर्यंत उभय देशातली भागीदारी व्यापक झाली आहे.

👉झांबिया हा खनिजसमृद्ध देश आहे.

👉इतर खनिजांबरोबरच भारत झांबियाकडून मोठ्या प्रमाणात तांबे धातूची आयात करतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...