Tuesday, 20 August 2019

महाराष्ट्राचा मल्ल निघाला जग जिंकायला; राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

▪️महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मंगळवारी या स्पर्धेसाठी पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला.

▪️ 14 सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची पायरी आहे.

▪️त्यामुळे राहुलकडून अनेकांच्या अपेक्षा लागल्या आहेत.

▪️संघटनेतील राजकारणाचा बळी पडल्यानं राहुलला 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यानं 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले आणि विरोधकांना चपराक लगावली.

✅ राहुलने राष्ट्रकुल स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. आता त्यानं निवड चाचणी स्पर्धेत 61 किलो वजनी गटात बाजी मारून जागतिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली आहे.

▪️ उपांत्य फेरीत त्यानं नवीन कुमारवर 9-4 असा मोठा विजय मिळवला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...