Sunday, 18 August 2019

नागालँडची पहिली महिला ऑलिम्पियन- चेक्रोवोलू सुरो

◼️चेक्रोवोलू सुरो- या नावाचे भारताच्या आणि नागालँडच्या ऑलिंपिक इतिहासात विशेष स्थान आहे. विशेष स्थान यासाठी की या नावाची ही महिला नागालँडची पहिली महिला अॉलिम्पियन आणि या राज्यातून ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेली केवळ दुसरीच खेळाडू आहे. तिचा खेळ…तिरंदाजी!

◼️वयाच्या 13 व्या वर्षीच 1994 मध्ये तिने पहिल्यांदा धनुष्यबाण हाती घेतला आणि 2011 पर्यंत देशातील आघाडीची तिरंदाज असा तिने नावलौकिक कमावला.

◼️1999 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणातच तिचे सुवर्ण पदक अगदी थोडक्यात हुकले. बँकाॕक येथील आशियाई ग्रँड प्रिक्स स्पर्धेत तिचा समावेश असलेला संघ रौप्यपदक विजेता ठरला होता. त्यानंतर 2002 व 2006 च्या आशियाडसह बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. 2012 च्या अॉलिम्पिकसाठी भारताच्या तिरंदाजी चमूत ती होती.

◼️त्याच्या तब्बल 64 वर्ष आधी म्हणजे 1048 मध्ये नागालँडच्याच डॉ. तालिरमेन ऐओ यांनी भारतीय फूटबॉल संघाचे अॉलिम्पिकमध्ये नेतृत्व केले होते. विशेष म्हणजे डॉ. तालिरमेन अनवाणी पायाने खेळले होते. ईशान्येकडील राज्यातून भारतासाठी अॉलिम्पिक खेळलेले ते पहिले खेळाडू होते.

◼️चेक्रोवोलू ही फेक जिल्ह्यातील खेडूत. गावात अंगा नावाने ती लोकप्रिय. तिची मोठी बहिणसुध्दा तिरंदाज. तिला बघून बघूनच हीसुध्दा नेम साधायला लागली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली. 2011 मध्ये भारतीय संघाने ट्युरिन येथे तिरंदाजीच्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आणि चेक्रोवालू प्रकाशझोतात आली. 2012 च्या आॉलिम्पिकमध्ये तिला यश मिळाले नाही. 2013 मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment