Thursday, 29 August 2019

आता व्हॉट्सअॅपवरून करता येणार उबरची तक्रार

✍अॅपद्वारे टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनी उबेरने देशात 24 तास हेल्पलाइन सुरू केली आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली.

✍तर या हेल्पलाइन क्रमांकावर प्रवासी कोणत्याही वेळी प्रवासादरम्यान, गाडी खराब झाल्यास, ड्रायव्हरसोबत वाद झाल्यास किंवा अन्य कोणत्याही प्रश्नांसाठी फोन करू शकतील.

✍तसेच यापूर्वी कंपनीच्या हेल्पलाइन सुविधेत केवळ मेसेज करण्याची मुभा होती. परंतु आता प्रवासी व्हॉट्सअॅपद्वारे  फोन करून मदत घेऊ शकणार आहेत.

✍उबेरच्या अॅपमध्ये असलेली ही सुविधा थेट प्रवाशांना कंपनीच्या सुरक्षा टीमसोबत बोलण्याची मुभा देणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच सुरक्षा मानकांनुसार पूर्वीपासूनच अॅपमध्ये एसओएस बटन देण्यात आले

✍असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. याच्या सहाय्याने आपात्कालिन परिस्थितीत तात्काळ पोलिसांशी जोडले जाऊ शकतो.

✍दरम्यान, मार्च महिन्यापासून या हेल्पलाइन फिचरचा वापर चंडीगढमध्ये सुरू करण्यात आला होता. आता कंपनीने आपले परिचालन असलेल्या सर्व 40 शहरांमध्ये हे फिचर उपलब्ध करून दिले आहे.

✍अमेरिका आणि कॅनडामध्ये कंपनी ही सुविधा पूर्वीपासूनच देत आहे. भारतात सुरूवातीला ही सुविधा इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध असेल. परंतु उबर लाइटवर ही सेवा उपलब्ध नसेल. उबरच्या सर्व ग्राहकांना या सुविधेचा वापर करता येणार आहे.

No comments:

Post a Comment