📌लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
📌तीन महिन्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये ही समिती सरकारला आपला अहवाल सोपवेल. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत देशाचे २६ वे लष्करप्रमुख आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होतील. तेच देशाचे पहिले सीडीएस असू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. सीडीएस तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना वरिष्ठ असतील कि तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांच्या समान त्यांचा दर्जा असेल ते अजून स्पष्ट झालेले नाही. सीडीएसचा कार्यकाळ किती असेल ते सुद्धा अजून स्पष्ट नाही असे हिंदुस्थान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
📌संरक्षण तज्ञांनी आतापर्यंत अनेकवेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९ साली पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करेल. तिन्ही सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
No comments:
Post a Comment