Thursday, 29 August 2019

येणार आमदारांसाठीही आचारसंहिता

📍 लवकरच सर्व आमदारांसाठी आचारसंहिता तयार केली जाईल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली घोषणा.

🗣 ओम बिर्ला म्हणाले :

● ही आचारसंहिता तयार करण्यासाठी सर्व विधानसभा सभापतींची समिती स्थापन केली जाईल.
● ही समिती सर्व विधानसभांच्या आणि विधान परिषदांच्या सभापतींशी चर्चा करेल.
● हि समिती नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर करेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

🤝 बैठकीत एकमुखाने पाठिंबा :

● यासंदर्भात विधानसभा आणि विधान परिषदांचे सभापती मिळून 30 हून अधिक पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक झाली.
● यावेळी विधानसभांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमावली तयार करण्यावर सर्व सभापतींचे मतैक्य झाले.
● सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे आणि कमीत कमी वेळा सभागृह स्थगित करण्याची वेळ यावी, यासाठी आमदारांसाठी आचारसंहिता तयार करण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला.

💫 यामुळे विधानसभेतील कामकाज सुरळीत चालेल आणि सातत्याने सभागृह स्थगित होण्याचे प्रकार कमी होतील.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...