महत्वाचे मुद्दे:
· सभोवतालचा रंगबेरंगी देखावा आणि प्रकृतीक सौंदर्य पाहण्याचा आनंद आपल्याला डोळ्याच्या विशिस्ट संवेदना आणि प्रकाश यामुळे होतो.
· विद्युत चुंबाकीय प्रारण या नावाने ऊर्जेचे रूप म्हणजे प्रकाश. प्रकाशामुळे डोळ्याला दृष्टी प्राप्त होते.
· क्ष-किरण, दृश्य प्रकाश, रेडियो लहरी, हे सर्व विद्युत चुंबकीय वर्णपटलाचे भाग आहेत.
· प्रकाश किरणांची तरंग लांबी 4×10-7 m ते 7×10-7 m च्या दरम्यान असते.
· प्रकाशाच्या प्रसारणाच्या मार्गाला प्रकाश किरण म्हणतात.
· अनेक प्रकाश किरण एकत्र येऊन शलाका तयार होतात.
· प्रकाश किरण त्यांच्या उगमस्थांनापासून सरळ रेषेत प्रवास करतात.
· जर प्रकाशाच्या प्रसारणाच्या दिशेने एखादी वस्तु आली तर तिची छाया तयार होते.
आरसा :
· आपण दररोज वापरतो त्यापैकी सपाट आरशाशी आपला जास्त संबंध आहे.
· आरसा हा परवर्तंनशील पृस्ठभाग आहे.
· सपाट आरसा म्हणजे सपाट काच असून तिच्या एका पृस्ठभागावर परावर्तक पातळ लेप देऊन त्यावर लाल रंग दिल्याने परावर्तक थराचे संरक्षण केलेले असते.
· आरशाचा दूसरा प्रकार म्हणजे वक्र गोलाकार आरसा होय.
· तो गोलाकार परवर्तनशील पृष्ठभागाचा एक भाग असतो. त्याचा काटछेद हा वर्तुळपाकळी असतो. काचेच्या एका पृष्ठभागावर परावर्तक लेप देऊन दूसरा पृष्ठभाग चकचकीत केलेला असतो.
अंतर्वक्र आरसा -
· जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात.
· आतल्या पृष्ठभागावरून परावर्तन होते. त्यालाच अभिसारी आरसा म्हणतात.
· कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदुजवळ अभिसारीत होतात.
बहिर्वक्र आरसा -
· जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात.
· बाहेरचा पृष्ठभागावरून परावर्तन होते.
· मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर अपसारीत होत असल्याने या आरशाला आपसरी आरसा असे म्हणतात.
गोलाकार आरशाशी संबंधित संज्ञा :
वक्रता मध्य - (C) Centre of Curvature
· गोलाकार आरसा ज्या गोलचा भाग आहे त्याच्या केंद्रबिंदूला वक्रता मध्य किंवा वक्रता केंद्र म्हणतात.
ध्रुव - (p) Pole
· गोलीय आरशाच्या मध्यबिंदूला ध्रुव किंवा गुरुत्व मध्य म्हणतात.
मुख्य अक्ष - Principal Axis
· आरशाचा ध्रुव आणि वक्रतामध्य यामधून जाणार्या सरळ रेषेला मुख्य अक्ष म्हणतात.
वक्रता त्रिज्या - (R) Radius of Curvature
· आरशाचा वक्रता मध्य व ध्रुव यांच्यामधील अंतराला 'वक्रता त्रिज्या' म्हणतात.
अंतर्वक्र आरशाची नाभी - (F) Focus
· अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदुजवळ येतात. त्यालाच 'अंतर्वक्र आरशाची नाभी' म्हणतात.
नाभीय अंतर - (F) Focal Length
· आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यामधील अंतराला आरशाचे 'नाभीय अंतर' म्हणतात.
No comments:
Post a Comment