🔰'चांद्रयान-2' ही चंद्रावर स्वारी करणारी हिंदुस्थानची मोहीम योग्य दिशेने चालली असून ठरल्याप्रमाणे हे यान चंद्राच्या दक्षिणेकडील बाजूला येत्या 7 सप्टेंबरला उतरणार आहे, अशी माहिती हिंदुस्थानी अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) नुकतीच ट्विटरवरील आपल्या अधिकृत हॅण्डलवर दिली.
🔰या मोहिमेत इस्रो चंद्राच्या आतापर्यंत कधीही समोर न आलेल्या बाजूचे संशोधन करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणारे हिंदुस्थानचे हे पहिलेच पाऊल असणार आहे. या यानामध्ये ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोव्हर अशी तीन उपकरणे आहेत. आपल्या बळावर चंद्रावर स्वारी करणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरला आहे . यापूर्वी अमेरिका , रशिया आणि चीनने चंद्रावर उतरण्याची कामगिरी केली आहे . बुधवारीच हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन ते चार या वेळेत ' ट्रान्स लुनर इन्सर्शन ' ही प्रक्रिया यानाने पार पाडली आहे . त्यानंतर 20 ऑगस्टला ' चांद्रयान -2' हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार असून त्यानंतर 7 सप्टेंबरला ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरेल , असेही इस्रोने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे .
No comments:
Post a Comment