Sunday, 25 August 2019

फ्रान्समध्ये जी-7 शिखर परिषद 2019 आयोजित

फ्रान्स देशाच्या बिआरिट्झ या शहरात 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2019 या काळात 45 वी जी-7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सुरू असलेल्या या शिखर परिषदेत उपस्थित राहणार आहेत. तेथे ते पर्यावरण, हवामान आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या जागतिक विषयांवर चर्चा करतील आणि जागतिक नेत्यांची भेट घेतील.

💁‍♂जी-7 (ग्रुप ऑफ सेव्हन) बद्दल

1975 साली प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली. पुढे 1976 साली कॅनडा यात सामील झाले आणि समूहाचे नाव ‘जी-7’ समूह हे पडले.

सन 1997 ते सन 2014 या काळात, या गटात रशियाचा समावेश होता आणि त्यामुळे हा ‘ग्रुप ऑफ एट’ म्हणून ओळखला जात होता. म्हणूनच 2014 साली याची पुनर्रचना झाली असून ते स्थापना वर्ष आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, या समूहाच्या सदस्यत्वासाठी उच्च निव्वळ राष्ट्रीय संपत्ती आणि उच्च मानव विकास निर्देशांक असणे आवश्यक आहे. या गटातल्या प्रगत अर्थव्यवस्थांची एकत्रित संपत्ती निव्वळ जागतिक संपत्तीच्या 58% आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...