Monday, 5 August 2019

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार जम्मू काश्मीरसंदर्भातील कलम 370 हटवण्यात आलं आहे. काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये होण्यासंदर्भात विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं आहे

🔰🔰.🔰🔰

आतापर्यंत काय काय घडलं?
जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा गेला
अमित शहा यांनी जम्मू काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेसंदर्भात प्रस्ताव
जम्मू काश्मीर राज्य दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्याचा प्रस्ताव
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधिमंडळ असेल
लडाख या केंद्रशासित प्रदेशात विधिमंडळ नसेल
शिवसेना, बसप आणि बीजू जनता दलचा विधेयकांना पाठिंबा
रालोआचा घटकपक्ष असलेल्या जेडीयूचा विरोध

अमित शहांनी मांडलेली 4 विधेयकं अशी आहेत
1) कलम 370 हटवणे.

2) जम्मू काश्मीर मधलं आरक्षण धोरण बदलणे.

3) कलम 35A हटवणे.

4) जम्मू काश्मीरचे 2 केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभाजन करणे.

याविषयी अधिक वाचण्यासाठी इथं क्लिक करा

भारतानं धोकादयक खेळ खेळल आहे - पाकिस्तान
"प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यांच्यावर दूरगामी परिणाम होईल असा धोकादायक खेळ भारताने खेळला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या सहकार्याने काश्मीरप्रश्नी तोडगा काढू पाहत होते. परंतु भारताने प्रश्नाचा तिढा सोडवण्याऐवजी चिघळवला आहे. पाकिस्तान काश्मिरी बांधवांच्या पाठिशी आहे. त्यांना आम्ही कधीही परकं करणार नाही. राजकीयदृष्ट्या आणि मुत्सदीदृष्ट्या आम्ही काश्मीरवासीयांना पाठिंबा देऊ. काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय मुस्लीम समुदायाने भारताचा निषेध करावा असं आवाहन केलं आहे," असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटलंय.

बलुचिस्तान ताब्यात घ्या - संजय राऊत
या मुद्द्यावर चर्चा करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं काश्मीर आणि बलुचिस्तानच भारतानं ताब्यात घेण्याची मागणी करून टाकली आहे.

जम्मू काश्मीरची स्वायत्तता समाप्त
कलम 370 मुळे काश्मीरचं स्वतःचं संविधान होतं. त्यामुळेच सुरक्षा आणि परराष्ट्र मंत्रालयाचे विषय सोडून इतर सर्व विषयांवर निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार होता. संविधानातून हे कलमच हटल्यामुळे काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा गेला आहे. 1947 मध्ये स्वायत्तता मिळण्याच्या अटीवरच काश्मीर भारतात विलीन झालं होतं.

पण हे कलम 370 काय आहे हे वाचवण्यासाठी इथं क्लि करा.
यासह कलम 35A सुद्धा संविधानातून काढून टाकण्यात आलं आहे. हे कमल नेमकं काय आहे हे वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

काश्मीरी नेत्यांना विश्वासात घेणं गरजेचं - शरद पवार
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर खोऱ्यात नेमकी काय प्रतिक्रिया उमटेल हे सांगता येत नाही, आपण शांतता राहील याची अपेक्षा करू या, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन
विरोध करणाऱ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेऊन याकडे पाहावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असंही ठाकरे यांनी म्हटलंय.

No comments:

Post a Comment