Friday, 30 August 2019

एका ओळीत सारांश, 30 ऑगस्ट 2019

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉राष्ट्रीय क्रिडा दिन – 29 ऑगस्ट.

👉तेलुगू भाषा दिन – 29 ऑगस्ट.

👉आंतरराष्ट्रीय अणुचाचणी प्रतिबंधक दिन – 29 ऑगस्ट.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉29 ऑगस्ट 2019 रोजी या बँकेनी चेन्नईत त्याचे पहिले MSME सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) सुरू केले - इंडियन बँक.

👉28 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोळसा खाण क्षेत्र, कंत्राटी निर्मिती उद्योगांमध्ये एवढ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणूकीला (FDI) मंजूरी दिली गेली - 100 टक्के.

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉पर्यावरण मंत्रालयाने 27 राज्यांना वनीकरणासाठी हस्तांतरित केलेला निधी - 47,436 कोटी रुपये.

👉भारताची हवाईसेवा कंपनी, जी 2 ऑक्टोबर 2019 पासून त्याच्या विमानात एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणार आहे - एयर इंडिया.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा 2019 याचे ठिकाण - कझान, रशिया.

👉आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा 2019 यामध्ये भारताच्या चमूने जिंकलेल्या पदकांची संख्या - 1 सुवर्ण, 1 रजत,2 कांस्य आणि 15 उत्कृष्ट (स्पर्धेत 13 वे स्थान).

👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सेफ सिटीज इंडेक्समध्ये प्रथम स्थान - टोकियो, जापान (त्यानंतर सिंगापूर आणि ओसाका).

👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सेफ सिटीज इंडेक्समध्ये शेवटचे स्थान - काराकस, व्हेनेझुएला.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सेफ सिटीज इंडेक्समध्ये मुंबईचे स्थान - 45 वा (आणि दिल्ली 52 वा).

👉29 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले अभियान - 'फिट इंडिया'.

👉या ठिकाणी इंटरनॅशनल कोलिशन फॉर डिझास्टर रेजिलींट इन्फ्रास्ट्रक्चर (CDRI) याचे सचिवालय कार्यालय स्थापन केले जाणार - नवी दिल्ली.

👉23 सप्टेंबर 2019 रोजी होणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघ हवामान कृती शिखर परिषदेचे ठिकाण - न्यूयॉर्क, अमेरिका.

👉भारतातली पहिली बॅटरीवर धावणारी सिटी बस सेवा – गांधीनगर, गुजरात.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉सिनीयर ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत 10 मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी भारतीय नेमबाज - इलावेनिल वालारीवन.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉1930 साली या खगोलशास्त्रज्ञाने प्लूटो (बटु ग्रह) शोधला - क्लाईड टॉमबॉघ (अमेरिका).

👉एयर इंडिया या हवाईसेवा कंपनीची स्थापना - 15ऑक्टोबर 1932.

👉परदेशातल्या एका संस्थेद्वारे देशातल्या व्यवसायामध्ये मालकी हक्क घेण्यासाठी होणारी गुंतवणूक - थेट परकीय गुंतवणूक (FDI).

👉या साली भारतात परकीय गुंतवणूकीला सुरूवात झाली – सन 1991.

👉आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) – स्थापना वर्ष: सन 1907; मुख्यालय: म्युनिच, जर्मनी.

🌹🌳🌴27 राज्यांमधल्या वनीकरणासाठी केंद्र सरकारने 47,436 कोटी रूपयांचा निधी दिला🌴🌳🌹

👉देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना देण्यासाठी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी 27 राज्यांना 47,436 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला.

👉महाराष्ट्राला 3844.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

👉वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली योगदान (NDC) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वनीकरणाकरिता हा निधी वापरला जाणार आहे.

👉क्षतिपूरक वनीकरणनिधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (CAMPA) याच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे.

👉 क्षतिपूरक वनीकरणासाठी गोळा केलेल्या निधीचा राज्यांकडून वापर होत नसल्याच्या सुरुवातीच्या अनुभवानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली या प्राधिकरणाच्या स्थापनेचे आदेश दिले होते.

👉त्या 27 राज्यांमध्ये ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, आसाम, बिहार, सिक्कीम, मणीपूर, गोवा, पश्चिम बंगाल, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, तामिळनाडू आणि केरळ यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...