Sunday, 25 August 2019

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश

​​​

👉 इंग्लंडमध्ये 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब झालं आहे.

👉 राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून नुकतीच याची घोषणा करण्यात आली. आयसीसीनंही याबाबत ट्वीट करुन याची माहिती दिली.

👉 त्यामुळे 24 वर्षांनी राष्ट्रकुलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश होणार आहे.

🍁 क्रिकेटच सर्व समाने बर्मिंहॅम येथील एजबेस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

👉 यामध्ये एकूण आठ महिला संघ सहभागी होणार आहेत. याआधी 1998 च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने सुवर्ण पदक जिंकलं होतं.

👉 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्याचं आम्ही स्वागत करतो. स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेटसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चांगला मंच असल्याच लुईस मार्टिन यांनी म्हटलं.

👉 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये पार पडणार आहे.

🍁 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमधील जवळपास 45 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...