Sunday, 18 August 2019

रवी शास्त्री: नोव्हेंबर 2021 पर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

✍17 ऑगस्ट रोजी कपिल देव (अध्यक्ष), अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड केली. आता रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषक 2021 पर्यंत असणार आहे.

👉रवी शास्त्री यांची तिसऱ्यांदा प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. आता रवी शास्त्रींसमोर चार प्रमुख आव्हाने आहेत आणि ते आहेत – 2020 साली टी-20 विश्वचषक; 2021 साली टी-20 विश्वचषक, 2021 विश्व कसोटी अजिंक्यपद आणि 2021 विश्व एकदिवसीय अजिंक्यपद.

रवी शास्त्री यांची जुलै 2017 मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली होती. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 21 कसोटी सामने खेळले. त्यातल्या 13 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 36 सामन्यांपैकी 25 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यासोबतच एकदिवसीय सामन्यात 60 पैकी 43 सामन्यांमध्ये विजय मिळवला.

No comments:

Post a Comment