Wednesday, 21 August 2019

मंत्रिमंडळाचे 19 महत्त्वाचे निर्णय, खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांचा विकास करणार

✍खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापण्यास मान्यता.

✍गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय.

✍मुंबई शहरासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रकल्प राबविण्यासह त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता.

✍मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावर बीड जिल्ह्यातील 4800 कोटींच्या कामासाठी निविदा मागविणार.

✍कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल व परिसराच्या विकास आराखड्यास मान्यता.

✍साताऱ्याच्या जिहे कठापूर येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता.

✍राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानांतर्गत उपजीविकेसाठी कौशल्य संपादन व ज्ञान जागरुकता अभियान (संकल्प) प्रकल्प राज्यात राबविण्यास मान्यता.

No comments:

Post a Comment