Sunday, 11 August 2019

✅एका ओळीत सारांश, 12 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच स्टार्टअप्स उद्योगांसाठी तयार करण्यात आलेले भारताचे प्रथम कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड - फ्रीडम कार्ड (एनकॅश कंपनीचे).

👉मास्टरकार्डद्वारे समर्थित असलेले हेल्थकॅश या संकल्पनेसह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड तयार करणारी संस्था - RBL बँक आणि प्रॅक्टो कंपनी.

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉नव्याने शोधला गेलेला तलाव जो जगातला सर्वाधिक उंच ठिकाणी असलेला तलाव आहे - काजिन सारा तलाव (नेपाळच्या मानंग जिल्ह्यात सिंगारखारका येथे समुद्रसपाटीपासून 5,200 मीटर उंचीवर असलेला 1,500 मीटर लांबीचा आणि 600 मीटर रुंद तलाव).

👉आता, जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वाधिक उंच ठिकाणी असलेला तलाव - तिलीचो तलाव(नेपाळमध्ये समुद्रसपाटीपासून 4919 मीटर उंचीवर असलेला 4 किमी लांबीचा आणि 1.2 किमी रुंद आणि सुमारे 200 मीटर खोल तलाव).

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉CREDAI आणि CBRE या संस्थांच्या अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगातला प्रथम क्रमांकाचा देश – संयुक्त राज्ये अमेरीका.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉CREDAI आणि CBRE या संस्थांच्या अहवालाच्या मते, स्टार्टअप उद्योगांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा जगातला क्रमांक – तिसरा.

👉CREDAI आणि CBRE या संस्थांच्या अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत भारताचा जगातला क्रमांक - चौथा.

👉‘लवाद व समन्वय (दुरुस्ती) कायदा-2019’ यामधल्या तरतुदींनुसार स्थापना करण्यात येणार्‍या लवाद परिषदेचे अध्यक्ष – भारतीय प्रधान न्यायाधीश (CJI).

👉‘बिल्डिंग बेटर कोट्स: सर्वेयींग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ इंडियाज डिस्ट्रिक्ट कोर्ट्स’ या अहवालानुसार, जिल्हा न्यायालय संकुलात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक - चंदीगड (त्यानंतर दिल्ली).

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता - लिओनेल मेस्सी.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉‘बिल्डिंग बेटर कोट्स: सर्वेयींग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ इंडियाज डिस्ट्रिक्ट कोर्ट्स’ या अहवालानुसार, जिल्हा न्यायालय संकुलात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक – 18 वा.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉“HarmonyOS” (किंवा चीनी भाषेत हाँगमेंग) या नावाने चीनचे स्वतःचे ऑपरेटिंग सिस्टम तयार करणारी कंपनी - हुवेई.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) याचे स्थापना वर्ष -  सन 1999.

👉युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) – स्थापना वर्ष: सन 1954; मुख्यालय: न्यॉन, स्वित्झर्लंड.

👉स्वातंत्र्यानंतर भारताचे प्रथम प्रधान न्यायाधीश - हरीलाल जेकिसुनदास कानिया (14 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950).

👉फेडरल कोर्ट ऑफ इंडिया (स्वातंत्र्यापूर्वी) येथे प्रथम प्रधान न्यायाधीश - मॉरिस ग्वेयर (1 ऑक्टोबर 1937 ते 25 एप्रिल 1943).

👉फेडरल कोर्ट ऑफ इंडिया येथे प्रथम भारतीय प्रधान न्यायाधीश - श्रीनिवास वरदाचारीयर (25 एप्रिल 1943 ते 7 जून 1943).

👉वर्तमानातले भारताचे प्रधान न्यायाधीश - रंजन गोगोई(3 ऑक्टोबर 2018 पासून).

No comments:

Post a Comment