Sunday, 11 August 2019

📚 *चालू घडामोडी (11/08/2019)*📚


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा*

● 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली.

● ‘हेलारो’  या गुजराती चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला.

● ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला.

● मराठी चित्रपट ‘पाणी’ ला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

● ‘बधाई हो’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.

● हिंदी चित्रपट ‘पॅड मॅन’ ला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले.

● ‘अंधाधुन’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला.

●  ‘ओंदला एर्दला’ या कन्नड चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गीस दत्त पुरस्कार जाहीर झाला.

● ‘पाणी’ या मराठी चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवण्यात आले.

● ‘नाळ’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरवण्यात आले.

● ‘चुंबक’ या मराठी चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला.

● ‘आई शप्पथ’ साठी दिग्दर्शक गौतम वझे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

● ‘आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना ‘अंधाधुन’ आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातल्या भूमिकांबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा संयुक्त पुरस्कार जाहीर झाला.

● तेलगू चित्रपट ‘महानती’ मधील भूमिकेसाठी किर्ती सुरेश या अभिनेत्रीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

● ‘उरी’ या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

___________________________
      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *आरबीआयच्या रेपो दरात कपात*

◆ सहा सदस्यीय पत धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला.

◆ ही आरबीआयने केलेली सलग चौथी कपात आहे.रेपो दर (तो व्याज दर, ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देते) ५.७५ टक्के होता, जो सप्टेंबर २०१० नंतरचा सर्वात कमी दर होता.

◆ त्यानंतर आरबीआयने तीन वेळा रेपो दर ०.७५ टक्के केला. यामुळे कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *​लेखिका टोनी मॉरिसन यांचे निधन

• आधुनिक साहित्याच्या जनक मानल्या गेलेल्या, नोबेल पुरस्कारप्राप्त लेखिका टोनी मॉरिसन यांचे अल्प आजाराने सोमवारी रात्री येथे निधन झाले.

• त्या ८८ वर्षांच्या होत्या. बिलव्ह्ड, साँग ऑफ सोलोमन यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाचकांची पसंती मिळाली.

• वंशांच्या सीमा सांभाळतानाही स्वातंत्र्याचा केलेला व स्वप्नवत वाटणारा पुरस्कार हे त्यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य होते.

• मॉरिसन यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे प्रकाशक आल्फ्रेड नॉफ यांनी जाहीर केले.

• टोनी मॉरिसन यांनी 'दि ब्लूएस्ट आय' ही पहिली कादंबरी त्यांच्या चाळीसाव्या वर्षी लिहिली.
https://t.me/TargetMpscMh
• वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत त्यांच्या सहा कादंबऱ्या गाजत होत्या. 'व्हिजनरी फोर्स' या त्यांच्या साहित्यकृतीला 1993 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.

• साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019*

● सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
● सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
● सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी)
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्ती सुरेश (महानटी)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
●  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
● सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आदित्य धर (उरी)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक –सुधाकर रेड्डी यंकट्टी(नाळ)
●  सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदू मनी
●  सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या आणि ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट - केजीएफ
● सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बधाई हो
● सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅडमॅन

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...