1) ‘चंद्रोदय’ या जोडशब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा.
1) आ + उ = ओ 2) द्र + ओ = द्रो
3) अ + उ = ओ 4) र + ओ = रो
उत्तर :- 3
2) नामाच्या उपप्रकारांपैकी फक्त ......................... अनेकवचन होते.
1) विशेषनामाचेच 2) धर्मवाचक नामाचेच
3) भाववाचक नामाचेच 4) सामान्य नामाचेच
उत्तर :- 4
3) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – हा माझा वर्गबंधू आहे.
1) दर्शक सर्वनाम 2) संबंधी सर्वनाम
3) आत्मवाचक सर्वनाम 4) पुरुषवाचक सर्वनाम
उत्तर :- 1
4) ‘कडक ऊन पडले आहे’ अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
1) धातुसाधित 2) संख्यावाचक
3) गुणवाचक 4) सार्वनामिक
उत्तर :- 3
5) ‘मला दोन मैल चालवते.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
1) प्रयोजक क्रियापद 2) संयुक्त क्रियापद
3) शक्य क्रियापद 4) अनियमित क्रियापद
उत्तर :- 3
6) भजन करा सावकाश | तुला झालासे कळस. यांतील सावकाश हे .......................... अव्यय आहे.
1) गतिदर्शक क्रियाविशेषण 2) स्थितीदर्शक क्रियाविशेषण
3) रीतिवाचक क्रियाविशेषण 4) कालवाचक क्रियाविशेषण
उत्तर :- 3
7) योग्य विधाने निवडा.
अ) काही शब्दयोगी अव्यये विभक्ती प्रत्यययाची कामे करतात.
ब) व ती लागण्यापूर्वी त्याचे बहुधा सामान्यरूप होते.
1) अ योग्य 2) ब योग्य 3) दोन्ही योग्य 4) दोन्ही अयोग्य
उत्तर :- 3
8) खालील उभयान्वयी अव्यये व त्यांचे उपप्रकार यांच्या जोडया जुळवा.
अव्यये उपप्रकार
अ) स्वरूपदर्शक I) म्हणून
ब) समुच्चय बोधक II) पण
क) उद्देश दर्शक III) आणि
ड) न्यूनत्वबोधक IV) म्हणजे
अ ब क ड
1) IV III I II
2) III I IV II
3) II IV III I
4) IV II I III
उत्तर :- 1
9) खालीलपैकी किती तिरस्कारदर्शक अव्यये आहेत.
इश्श, छत, छी, शीड, हुड, छे
1) पाच 2) सर्व 3) चार 4) तीन
उत्तर :- 1
10) पुढीलपैकी अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण कोणते ?
1) मी निबंध लिहिला आहे 2) मी निबंध लिहीत आहे
3) मी निबंध लिहीत असतो 4) मी निबंध लिहितो
उत्तर :- 2
Hello
ReplyDelete