🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹
👉29 जुलै 2019 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमण्यात आलेले संचालक - अतनू चक्रवर्ती.
👉उद्योग व अंतर्गत व्यापार जाहिरात विभागाच्या ‘वार्षिक अहवाल 2018-19’ याच्यानुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूकीची (FDI) नोंद झाली, जी – 64.37 अब्ज डॉलर होती.
👉अमेरिकेच्या Mad*Pow या धोरणात्मक सल्लागार संस्थेला खरेदी करणारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली भारतीय कंपनी - टेक महिंद्रा.
🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹
👉‘डेल ग्लोबल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ या यादीत प्रथम स्थान - सॅन फ्रान्सिस्को बे एरिया (अमेरीका).
👉‘डेल ग्लोबल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ या यादीत आशियामध्ये अग्रस्थान - सिंगापूर (21 वा).
🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹
👉‘डेल ग्लोबल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ या यादीत भारतातले अव्वल ठरलेले शहर – बेंगळुरू (कर्नाटक) (जागतिक: 43 वे आणि आशियात 7 वे).
👉8 आणि 9 ऑगस्ट 2019 रोजी 22 वी ‘राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2019’ आयोजित करण्यात येत असलेले ठिकाण - शिलाँग, मेघालय.
👉‘ग्राहक संरक्षण विधेयक-2019’ याच्या अंतर्गत केंद्र सरकारला ही संस्था स्थापन करण्याविषयी तरतूद आहे - केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA).
👉या ठिकाणी ‘डोंगराळी लसूण (कोडाईकनाल मलाई पुंडू) या नावाने प्रसिद्ध असलेल्या लसणाला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला - कोडाईकनाल (तामिळनाडू).
🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹
👉30 जुलै रोजी निधन झालेले माजी RBI गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ - सुबीर गोकर्ण.
🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹
👉30 जुलै 2019 रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करणारा भारताचा माजी फलंदाज आणि आंध्र प्रदेश राज्याच्या कर्णधार - वेणुगोपाल राव.
🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹
👉महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात येणार असलेली संस्था - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), पुणे.
👉पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातल्या मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्प - आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी.
👉मंजुरी देण्यात आलेला महाराष्ट्र राज्यातला पहिला हायपरलूप प्रकल्प - मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड दरम्यान 117.50 कि.मी. अंतरासाठी).
👉“विधानगाथा” या पुस्तकाचे लेखक - हर्षवर्धन पाटील (माजी संसदीय कार्य मंत्री).
👉गुन्हेगारांच्या जैविक वैशिष्ट्यांची एकत्रित माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देणारी ॲम्बिस (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली वापरणारे भारतातले पहिले राज्य – महाराष्ट्र.
🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹
👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).
👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले गव्हर्नर - सर ओसबोर्न स्मिथ (1935 - 1937).
👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (1943-1949).
👉मेघालय राज्याची राजधानी - शिलाँग.
No comments:
Post a Comment