Saturday, 3 August 2019

📚 *चालू घडामोडी (03/08/2019)*📚

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार* #Award

◆ एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीचे
कार्यकारी संपादक आणि त्या चॅनेलवरील
प्राईम टाईम या शोचे होस्ट रवीश कुमार यांना आशियातील नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ वास्तवदर्शी पत्रकारितेचा वसा घेतलेल्या रवीश कुमार यांची देशातील सार्वकालिक महान पत्रकारांमध्ये गणना होते.

◆ यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि
पत्रकार अरुण शौरी तसेच द हिंदू या
वृत्तपत्राचे पी. साईनाथ यांनाही हा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. 

◆ हिंदी पत्रकारितेमधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. 

◆ रवीश कुमार यांनी १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत. रवीश कुमार यांच्यासह अन्य चार विजेत्यांमध्ये म्यानमारचे को स्वे विन, थायलंडमधील अंगखाना नीलापजीत, फिलीपिन्समधून रेमंडो पुजांते कैयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जोंग यांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

★ 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार':-

◆ या पुरस्काराची सुरुवात : एप्रिल 1957 पासून झाली.

◆ 'रॅमन मॅग्सेसे' हे आशियाचे नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखले जाते.

◆ हा पुरस्कार फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो.

◆ 2009 पासून ह पुरस्कार खालील सहा प्रकारात दिला जातो:-
◆ 1. Government services (GS)
◆ 2. Public services (PS)
◆ 3. Community leadership(CL)
◆ 4. Journalism, literature & creative communication arts (JLCCA)
◆ 5. Peace and International Understanding (PIU)
◆ 6. Emergent leadership (EL)

◆ जर्नलिज्म, लिट्रेचर और क्रिएटिव कम्युनिकेशन आर्ट्स कैटेगरी मध्ये  'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' भेटलेले भारतीय व्यक्ती:

1. 2019- रवीश कुमार
2. 2007- पालगुम्मी साईनाथ
3. 1997- महेश्वेता देवी
4. 1992- रवि शंकर
5. 1991- के वी सुबबना
6. 1984- राशीपुरम लक्ष्मण
7. 1982- अरुण शौरी
8. 1981- गौर किशोर घोष
9. 1975- बूबली जॉर्ज वर्गीस
10. 1967 - सत्यजित राय
11. 1961- अमिताभ चौधरी

◆ 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय.- विनोबा भावे

◆ 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारी पाहिली भारतीय महिला .- मदर टेरेसा

◆ 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय पत्रकार.- अमिताभ चौधरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *कपिल देव भारत गौरव पुरस्काराने सन्मानित* #Award

◆ १ ऑगस्ट रोजी, ईस्ट बंगाल क्लबने आपल्या 100 व्या वर्धापन दिनी कपिल देवला भारत गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
https://t.me/TargetMpscMh
◆  कपिल देव यांनी  22 जून 1992 ला इस्ट बंगाल क्लब जॉईन केले होते.त्यानंतर त्यांनी या क्लबच्या वतीने 27 मॅच खेळल्या.

★ ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब :-

◆ ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब हा कलकत्ता येथील एक फुटबॉल क्लब आहे.

◆ याची स्थापना 1 ऑगस्ट 1920 रोजी झाली.

◆ याने आतापर्यंत तीन राष्ट्रीय फुटबॉल लीग (आय-लीग), आठ फेडरेशन चषक आणि तीन भारतीय सुपर कप जिंकले आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *आसियानची 52 वी परराष्ट्र मंत्री बैठक*

◆ बँकॉकमध्ये 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान 52 व्या आसियान परराष्ट्रमंत्र्यांची बैठक आयोजित केली जात आहे.
 
★ आसियान (ASEAN)
The Association of South-East Asian Nations (ASEAN) ही 10 आग्नेय आशियाई देशांची प्रादेशिक आंतर-सरकारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना 6 ऑगस्ट 1967 रोजी झाली.

◆ याचे मुख्यालय : इंडोनेशिया (जकार्ता) येथे आहे.

◆ Motto : "One Vision, One Identity, One Community"

★ सहभागी देश:-

◆ 5 संस्थापक देश
1) इंडोनेशिया, 2) मलेशिया, 3) फिलीपिन्स, 4) सिंगापूर, 5) थायलंड,

◆ नंतर सहभागी झालेले देश
6) ब्रुनेई, 1984 
7) व्हिएतनाम 1995
8) लाओस, 1997
9) म्यानमार 1997
10) कंबोडिया, 1999

◆ उद्देश : सदस्य देशांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्य आणि विवादांचे शांततेने निवारण.

◆ आसियान महासचिव: लिम जौक होई (ब्रुनेई)
◆ कार्यकाळ : पाच वर्षे
◆ आसियानने मंजूर केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्याचे व कामात सहकार्य देण्याचे काम करतात.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यात ASEAN चे सदस्य सहभागी झाले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...