Friday, 2 August 2019

📚 *चालू घडामोडी (02/08/2019)*📚

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार* #Award

◆ एनडीटीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक आणि त्या चॅनेलवरील प्राईम टाईम या शोचे होस्ट रवीश कुमार यांना आशियातील नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ वास्तवदर्शी पत्रकारितेचा वसा घेतलेल्या रवीश कुमार यांची देशातील सार्वकालिक महान पत्रकारांमध्ये गणना होते.

◆ यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार अरुण शौरी तसेच द हिंदू या वृत्तपत्राचे पी. साईनाथ यांनाही हा पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. 

◆ हिंदी पत्रकारितेमधील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो.

◆ फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. 

◆ रवीश कुमार यांनी १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत. रवीश कुमार यांच्यासह अन्य चार विजेत्यांमध्ये म्यानमारचे को स्वे विन, थायलंडमधील अंगखाना नीलापजीत, फिलीपिन्समधून रेमंडो पुजांते कैयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जोंग यांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अतनू चक्रवर्ती: RBI च्या संचालक मंडळावर नेमण्यात आलेले नवे संचालक* #Appointment

◆ केंद्र सरकारने भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव पदावर असलेले अतनू चक्रवर्ती यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक केली आहे.

◆ चक्रवर्ती यांची ही नियुक्ती सुभाष चंद्र गर्ग यांच्या जागेवर करण्यात आली. चक्रवर्ती यांचे नामांकन 29 जुलै 2019 पासून आणि पुढील आदेशापर्यंत प्रभावी आहे.

◆ गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या फेरबदलात माजी आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांना वीज मंत्रालयात नियुक्त केले होते.

★ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

◆ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातली केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBIचे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.

◆ भारतीय रिझर्व्ह बँकेनी त्याच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतला.
https://t.me/TargetMpscMh
◆ RBIच्या मुख्यालयात एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *RBI चे डेप्युटी गव्हर्नर - सुबीर गोकर्ण यांचे निधन*

◆ ते नोव्हेंबर 2009 ते जानेवारी 2013 काळात RBI चे उप-गव्हर्नर होते

◆ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) चे कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

◆ 2010 साली त्यांनी भारतात प्रथिनांच्या फुगवट्याचा सिद्धांत मांडला होता.
(लोकांच्या मिळकतीत वाढ होत असल्याने जनता अंडी , डाळ आणि मांस याचा मोठ्या प्रमाणात आहार करत असल्याचे मत मांडले होते) त्यावर मात्र बरीच टीका झाली होती.

★ शिक्षण:-

◆ मुंबई - सेंट झेव्हीयर्स कॉलेज - BA
◆ दिल्ली - MA
◆ अमेरिकेत - PhD
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद शिलाँगमध्ये आयोजित केली जाणार*

◆ ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान शिलाँग, (मेघालय) येथे आयोजित केली जाईल.

◆ ईशान्येकडील राज्यात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

◆ ‘डिजिटल इंडियाः सक्सेस टू एक्सलन्स’ Digital India:  Success to Excellence”   ही या परिषदेची थीम आहे.

◆ ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभाग यांच्या वतीने हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि मेघालय सरकारच्या सहकार्याने आयोजित केले गेले आहे.

◆ या कार्यक्रमात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत. यात 450 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

◆ उद्दीष्ट: ईशान्येकडील राज्यांमध्ये ई-गव्हर्नन्सशी संबंधित पुढाकारांना गती देणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...