Sunday, 17 October 2021

Force


🏆 बल - वस्तू हलवण्यासाठी बलाची आवशक्यता असते. त्याचे प्रकार खालीलप्रकारे आहे.

✍🏻 बलाचे प्रकार

🏆 १. स्नायू बल - शरीराच्या भागाकडून लावल्या गेलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात.

✍🏻 २. यांत्रिक बल - यंत्रामुळे लावलेल्या बलास यांत्रिक बल असे म्हणतात.

✍🏻 ३. गुरुत्वीय बल - एखादी वस्तू बाल लाऊन वर फेकली कि थोड्या उंचीवर जाऊन  खाली पडते व पृथ्वी आपल्याकडे खेचते त्याला गुरुत्वीय बल असे म्हणतात.
विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतः कडे ओढते. त्याला गुरुत्व बल असे म्हणतात.

✍🏻 नियम - " विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरीही त्यांच्यात परस्पराना आकार्षणारे गुरुत्व बल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती व वास्तुमधील अंतराच्या वर्गाच्या व्यास्तनुपति असते.''

🏆 * गुरुत्व स्थिरांक (G)

★ * जसे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पृथ्वीच्या अंतरमार्गात जाऊ तसतसे गुरुत्व त्वरण कमी होते.
वजन - एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते. त्याला वस्तूचे वजन म्हणतात.वजन समीकरण - W =mg

🏆 * वस्तूवर कार्यरत असलेले गुरुत्व त्वरण अथवा गुरुत्व बल हे विषुववृत्त पेक्षा ध्रुवावर जास्त असते. त्यामुळे वस्तूचे वजनही    ध्रुवावर जास्त भरते.

✍🏻 * गुरुत्व बलाच्या मुक्त अवस्थेत अंतराळात प्रत्येक वस्तूचे वजन शून्य होते.

✍🏻 ३. चुंबकीय बल - चुंबकीय बल म्हणजे चुंबकाने लावलेले बल होय. उदा क्रेन मध्ये चुंबकीय बल असते.

✍🏻 ४. घर्षण बल -  वस्तू आणि पृष्ठभाग यामध्ये एक बल कार्य करत असते.

✍🏻 ५. स्थितीक विद्युत बल - घर्षणामुळे वीज निर्माण होणाऱ्या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात. उदा एबोनाईटची दांडी

🏆 ६. विद्युत चुंबकीय बल - सामान्य पदार्थातील अणुंना व रेणूना एकत्रित ठेवणाऱ्या बलास विद्युतचुम्बकीय बल असे म्हणतात.

✍🏻 ७. केंद्रकीय बल - अणूच्या केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे कण असतात. त्यांना धनप्रभारित असे म्हणतात.

✍🏻 क्षीण बल - इलेकट्रॉण प्रोटोन, न्युट्रोन, यांच्यात होणाऱ्या बलास क्षीण बल असे म्हणतात.

No comments:

Post a Comment