Thursday, 13 June 2024

इतिहास प्रश्नसंच

१. युरोपियन सत्तांनी भारतात स्थापन केलेल्या पहिल्या वाखारींसंदर्भात योग्य जोड्या जुळवा.

अ) पोर्तुगीज             १) कोची
ब) डच                      २) मछलीपट्टनम
क) ब्रिटीश                ३) सुरत
ड) डेन्स                    ४) चिंचोसा

        अ   ब   क   ड
   A.  ३   ४   २   १
   B.  ४   २   ३   १
   C.  १   २   ३   ४ ✔
   D.  २   १   ३   ४

२. १८१३ च्या सनदी कायद्यानुसार खालीलपैकी कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) कंपनीचा भारतातल्या व्यापाराचा एकाधिकार समाप्त केला.
ब) ख्रिश्चन मिशानरींना भारतात धर्मप्रसार करण्याची परवानगी देण्यात आली.
क) दरवर्षी १ लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली.
ड) भारतासाठी बिशप व कंपनीच्या इतर तीन प्रांतांसाठी आर्चबिशपची नेमणूक करण्यात आली.

   A. अ केवळ
   B. अ आणि ब
   C. अ ब आणि क
   D. वरील सर्व ✔

३. खालीलपैकी ब्रिटीश संसदेने केलेल्या कोणत्या कायद्यानुसार नियामक मंडळाची (Board of Control) स्थापना करण्यात आली ?

   A. नियामक कायदा १८७३
   B. पिट्स इंडिया कायदा ✔
   C. सनदी कायदा १८१३
   D. सनदी कायदा १८३३

४. वॉरेन हेस्टींग्जसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या.

अ) 'कलेक्टर' या पदाची निर्मिती केली.
ब) दुहेरी शासनव्यवस्था लागू केली.
क) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला.
ड) चार्ल्स विल्किंस च्या गीतेच्या इंग्रजी अनुवादाला प्रस्तावना लिहिली.

   A. ब बरोबर
   B. ब,क आणि ड बरोबर
   C. क आणि ड बरोबर
   D. अ,क आणि ड बरोबर ✔

५. १८०२ रोजी 'वसई' येथे झालेल्या तहात दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?

   A. वॉरेन हेस्टींग्ज
   B. वेलस्ली ✔
   C. डलहौसी
   D. कॉर्नवॉलिस

६. आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत असे जाहीर करणाऱ्या कोणत्या व्यक्तीने पंजाबमध्ये 'अहमदिया' आंदोलन सुरु केले ?

   A. सर सय्यद अहमदखान
   B. लियाकत अली
   C. खाफार खान
   D. मिर्झा गुलाम अहमद ✔

७. खालीलपैकी कोणाच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे सुसंकृतपणा(ब्रिटीश) व रानटीपणा यांमधील झगडा होता ?

   A. व्ही. ए. स्मिथ
   B. सर जॉन लॉरेन्स
   C. टी. आर. होल्म्स ✔
   D. सायमन फ्रेजर

८.
अ) गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म १८५६ मध्ये टेंभू(कराड) येथे झाला.
ब) १८८८ मध्ये सुधारक हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सुरु केले.
क) कर्वे प्रकरणामध्ये आगरकर व टिळक यांना १०१ दिवस तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

   A. फक्त अ
   B. अ आणि ब ✔
   C. वरीलपैकी एकही नाही
   D. वरील सर्व

९. खालीलपैकी कोणी नाग महिला नेत्या 'गायदिन लियू' यांना 'राणी' हि पदवी देऊन सन्मानित केले ?

   A. सुभाषचंद्र बोस
   B. महात्मा गांधी
   C. पंडित नेहरू ✔
   D. सरदार पटेल

१०) 'इंडिया डिव्हायडेड' या पुस्तकाचे लेखन कोणी केले ?

   A. स्वातंत्र्यवीर सावरकर
   B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
   C. डॉ. राजेंद्रप्रसाद ✔
   D. सर सय्यद अहमदखान

११. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या काराघृहात ठेवले होते ?

   A. ठाणे
   B. अंदमान
   C. मंडाले
   D. एडन ✔

१२. खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ?

अ) ज्ञान प्रसारक मंडळी
ब) बॉम्बे असोशिएशन
क) लंडन इंडियन असोशिएशन
ड) ईस्ट इंडिया असोशिएशन

   A. अ,ब आणि क फक्त
   B. ब,क आणि ड फक्त
   C. अ,ब आणि ड फक्त
   D. अ,ब,क आणि ड ✔

१३.भारतात रेल्वे चे जाळे उभारण्या करिता लोर्ड डलहौसीने नियोजन केले कारण

अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी
ब) ब्रिटीश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमाविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी
क) भारतात सहज व स्वस्त वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त ✔
   C. ब आणि क फक्त
   D. अ,ब आणि क

१४. सर अॅलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्या साठी प्रयत्न का केला ?

अ) ते विचाराने उदारमतवादी होते
ब) त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती
क) त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवे, असे वाटत होते
ड) त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते

   A. अ आणि ब फक्त
   B. अ आणि क फक्त
   C. अ,ब आणि क
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत ✔

१५. भारतातला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रीतीशांच्या धोरणात बदल झाला कराण -

अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर
ब) भारतात राष्ट्रावादास आलेले उधाण
क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम

   A. अ आणि ब फक्त
   B. बआणि क फक्त
   C. अ आणि क फक्त
   D. अ,ब, आणि क ✔

१६. खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात ई.स. १८४९ मध्ये स्थापना झालेल्या ‘परम हंस’ मंडळीचा भर होता ?

अ) जातीबंधाने तोडणे
ब) विधवा पुनर्विवाह
क) स्त्री शिक्षण
ड) मूर्तीपूजा बंदी

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त
   C. अ,ब आणि क फक्त
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य ✔

१७. हिंदुस्तान सरकारच्या १९३५ कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?

अ) मुडीमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरू रीपोर्ट
ड) बॅरीस्टर जिन्नांचे १४ मुद्दे

   A. अ,ब आणि क
   B. ब,क आणि ड
   C. अ,ब आणि ड
   D. अ,ब,क आणि ड ✔

१८. १९०६ च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी ‘स्वराज्य’ शब्द उघडपणे वापरला आणि ह्या अधिवेशनात

अ) राष्ट्रगीत म्हणून ‘वंदेमातरम्’ पहिल्यांदाच गायले गेले
ब) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला
क) मवाळ मार्ग चा स्वीकार करण्यात आला
ड) बॅरीस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले

   A. अ आणि ब
   B. क आणि ड
   C. ब आणि क ✔
   D. अ आणि ड

१९. अयोग्य जोडी निवडा

   A. श्रीधरलू नायडू - वेद समाज
   B. राजा राममोहन रॉय - आत्मीय सभा
   C. रवींद्रनाथ टागोर – तत्वबोधिनी सभा ✔
   D. शिवनारायण अग्निहोत्री – देव समाज

२०. अस्पृश्यांना ‘लष्करात व पोलिसात’ नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवड च्या सभेत कोणी मागणी केली ?

अ) शिवराम जानबा कांबळे
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क) अॅड. बि.सी. कांबळे
ड) गोपाळबुवा वलंगकर

   A. अ फक्त ✔
   B. ब फक्त
   C. क आणि ड
   D. ड फक्त

२१. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
   A. नीळ
   B. भात फक्त
   C. गहू फक्त
   D. भात व गहू ✔

२२. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या ?

अ) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.
ब) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे पर्यंत खाली आणणे.
क) लॉंर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.

   A. अ आणि ब ✔
   B. ब आणि क
   C. अ आणि क
   D. अ,ब आणि क

२३. पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?

   A. परमहंस मंडळी व रहनुमाई मझ्द्दासान सभा
   B. प्रार्थना समाज व आर्य समाज
   C. इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्विस लीग
   D. वरील तीन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही ✔

२४. ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

   A. जगन्नाथ शंकर शेठ
   B. बाळशास्त्री जांभेकर ✔
   C. भाऊ दाजी लाड
   D. छत्रपती शाहूमहाराज

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...