Saturday, 20 July 2019

◼️उत्तराखंड: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना राबविण्यात सर्वोत्तम ठरलेले राज्य

भारत सरकारची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत उत्तराखंड राज्य हे देशातल्या पाच सर्वोत्तम कामगिरी दर्शविणार्‍या राज्यांपैकी एक ठरले आहे. जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तरांच्या (SRB) बाबतीत उत्तराखंडने सर्वोत्तम कामगिरी दर्शविलेली आहे.

उत्तराखंडच्या व्यतिरिक्त, हरियाणा राज्याने जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तरांच्या बाबतीत सातत्यपूर्ण कामगिरीसाठी एक राज्यस्तरीय आणि दोन जिल्हास्तरीय पुरस्कारांसह एकूण तीन पुरस्कार जिंकले आहेत. हरियाणाच्या भिवानी आणि महेंद्रगड या दोन जिल्ह्यांनी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवलेत.

सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, जन्माच्यावेळी लिंग गुणोत्तर सरासरीने 161 जिल्ह्यांमध्ये वाढले असून ते प्रमाण सन 2015-16 मधील 909 मुली (प्रत्येक 1000 मुलांमागे) यावरून सन 2018-19 मध्ये 919 मुली एवढे होते.

❇️‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ (मुलगी वाचवा मुलगी शिकवा) (BBBP) हया उपक्रमाचा शुभारंभ हरियाणा राज्यातल्या पानिपतमध्ये दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी झाला. या उपक्रमात बाल लिंग गुणोत्तरात (child sex ratio) होणारी घसरण तसेच महिला सक्षमीकरण संदर्भातल्या मुद्दयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भारत सरकारच्या महिला व बाल कल्याण्य मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे.

◼️कार्यक्रमाची उद्दिष्टे -

🔸पक्षपाती लिंग निवड प्रक्रियेचे उच्चाटन करणे.

🔸मुलींचे अस्तित्व आणि संरक्षण याची खात्री करणे.

🔸मुलींच्या शिक्षणाची खात्री करणे.

‘पूर्वग्रह व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा-1994' कायद्याची अंमलबजावणी, देशभर जनजागृती आणि सल्ला ही मोहीम राबवणे तसेच बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असणाऱ्‍या 100 जिल्ह्यांमध्ये बहु-विभागीय उपाययोजना करणे यांचा पहिल्या टप्प्‍यात समावेश आहे. स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात प्रशिक्षण, जनजागृती यामध्ये वाढ करणे तसच सामुहिक एकत्रीकरण याद्वारे समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यावर सर्वात जास्त भर देण्यात आला आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते, लाडली लक्ष्मी, मुलींसाठी शाळेचा शुल्क माफ, मुद्रा कर्ज योजनेच्या अंतर्गत प्राधान्य, ‘सर्वांना घर’ योजनेच्या अंतर्गत अनुदान, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत विनामूल्य LPG जोडणी आणि अन्य अश्या विविध योजना राबविल्या जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...