Friday, 19 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०९ जुलै २०१९ ‌.

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०९ जुलै २०१९ ‌.

● आज २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध न्युझीलंड उपांत्य फेरीचा सामना होणार

● भारतीय संघाने सातव्यांदा आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे

● बीसीसीआयने राहुल द्रविड यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून निवड केली आहे

● डीआरडीओने पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या

● प्रतिष्ठित विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा २०१९ लंडन येथे सुरु आहे

● राफेल नदाल २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल

● सेरेना विलियम्स २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल

● युक्रेनची इलिना स्विटोलिना २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल

● अमेरिकेच्या अ‍ॅलिसन रिस्के २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल

● क्‍यारियाकोस मित्सोताकिस यांनी ग्रीसचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली

● चीनच्या ली शी फेंगने कॅनडा ओपन बॅडमिंटन टूर्नामेंट २०१९ पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले

● भारताच्या पारुपल्ली कश्यपला कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

● गोवा सरकार लवकरच विवाह नोंदणीपूर्वी एचआयव्ही टेस्ट अनिवार्य करणार

● दिल्ली-लखनऊ तेजस एक्सप्रेस खासगी कंपनीद्वारे संचालित होणारी पहिली रेल्वे बनली आहे

● भारतातील ३६% पेक्षा जास्त शाळांमध्ये अजुनही विजेची व्यवस्था नाही : सरकारी अहवाल

● दिल्ली सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी हॉस्पिटल्समध्ये लवकरच मार्शल नेमणार

● आधार कार्ड आता मोबाईल सीम घेण्यासाठी व बँक खाते उघडण्यासाठी अनिवार्य नाही

● कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाने  " कौशल युवा संवाद " कार्यक्रम सुरू केला

● मॅग्नस कार्लसनने क्रोएशिया ग्रँड चेस टूर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● भारताच्या विश्वनाथन आनंदला क्रोएशिया ग्रँड चेस टूर स्पर्धेत ११ व्या स्थानावर समाधान मानावे लागले

● कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप २०१९ स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली

● अभिजित गुप्ताने कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप २०१९ स्पर्धेत पुरुषांच्या गटाचे विजेतेपद पटकावले

● तानिया सचदेवने कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप २०१९ स्पर्धेत मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले

● ५ वी इंडो-भूटान फ्रेंडशिप टेनिस टूर्नामेंट स्पर्धा थिम्फु , भुटान येथे पार पडली

● भारताच्या वी खेटने ५ व्या इंडो-भूटान फ्रेंडशिप टेनिस टूर्नामेंट स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले

● अमेरिका तैवानला २.२ बिलियन डॉलर्सची शस्त्रास्त्रे विकणार : अमेरिका संरक्षण

● २०२२ पर्यंत ड्यूश बँके १८००० नोकर्या कमी करणार आहे

● ९ ते १२ जुलैदरम्यान एअर चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धनोआ रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत

● स्पोर्ट्सवेअर ब्रॅण्ड वेक्टर एक्सने ब्रॅड अॅम्बेसेडर म्हणून भारतीय फुटबॉलपटू दलिमा छिब्बेरची नियुक्ती केली

● कुत्नो एथलेटिक्स मीट २०१९ स्पर्धेत पी सरिताबेनने महिलांच्या ४०० मीटर मध्ये सुवर्णपदक पटकावले

● कुत्नो एथलेटिक्स मीट २०१९ स्पर्धेत सोनिया बैश्याने महिलांच्या ४०० मीटर मध्ये रौप्यपदक पटकावले

● कुत्नो एथलेटिक्स मीट २०१९ स्पर्धेत आर विथ्याने महिलांच्या ४०० मीटर मध्ये कांस्यपदक पटकावले

● पहिली संयुक्त राष्ट्र युवक हवामान परिषद २१ सप्टेंबरपासून न्युयाॅर्कमध्ये आयोजित करण्यात येणार

● राजस्थान विधानसभेने लोकायुक्त व उप-लोकायुक्त (दुरुस्ती) विधेयक २०१९ पारीत केले

● स्पेनने फ्रांन्सला ८८-६६ ने पराभूत करत २०१९ महिला युरोबास्केट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● ओडिशा सरकारने पद्मश्री पुरस्कार विजेत्यांना दहा हजार मासिक भत्ता देणार असल्याचे जाहीर केले

● साऊथ सेन्ट्रल रेल्वे झोनने भारतातील सर्वात लांब विद्युतीकरण केलेल्या रेल्वे बोगद्याचे निर्माण केले

● ६.६ किमी लांब विद्युतीकरण केलेला रेल्वे बोगदा चेरलोपल्ली व रापुरु या स्थानका दरम्यान स्थित आहे

● व्होडाफोन बिझनेसचे सीईओ म्हणून विनोद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली

● टाटा कम्युनिकेशन्सचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक विनोद कुमार यांनी राजीनामा दिला

● गायिका अनुराधा पौडवाल यांना " प्राइड ऑफ प्लॅनेट पुरस्कार २०१९ " जाहीर

● मेघालय सरकारने " स्मार्ट शिल्लॉन्ग मोबाईल सिटी " अॅपचे अनावरण केले

● मुलींना वाचवण्यासाठी गुजरात सरकारने " वहली डीकरी योजना " सुरु केली

● युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत प्रोसेक्को हिल्स , इटलीचा समावेश करण्यात आला

● ३ री ग्रीनबिल्ड इंडिया परिषद २०२० मध्ये बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात येणार

● संसदेने दंतचिकित्सा (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● राज्यसभेत आधार (सुधारणा) विधेयक , २०१९ पारीत करण्यात आले

● राज्यसभेचे सदस्य म्हणून परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शपथ घेतली .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...