Friday, 19 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १६ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१६ जुलै २०१९ .

● फिलीपीन एयरलाइन्सने २०१९ मधील जगातील सर्वात सुधारित एअरलाईन पुरस्कार जिंकला

● बाॅक्सर अमीर खानने डब्ल्यूबीसी इंटरनॅशनल वेल्टरवेट किताब पटकावला

● ८ वी जागतिक शिक्षण परिषद ४ ते ५ जुलै दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आली

● हरियाणाचे कृषी मंत्री ओ पी धनकर यांना २०१९ शेतकरी लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● एआयआयबीने विंड व सोलर इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पासाठी एल अँड टी फायनान्सला १०० दक्षलक्ष डाॅलर्सचे कर्ज मंजूर केले

● डच ज्युनिअर ओपन स्क्वाश स्पर्धा २०१९ अॅमस्टरडॅम , नेदरलँड्समध्ये पार पडली

● डच ज्युनिअर ओपन स्क्वाश स्पर्धेत अनाहत सिंहने अंडर-१३ मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले

● डच ज्युनिअर ओपन स्क्वाश स्पर्धेत नील जोशीने अंडर-१७ मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले

● आसाम पोलिस दलातील बिश्मिता लिखाक यांना ' विरांगाना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार २०१९ ' प्रदान

● आसाम पोलिस दलातील जवान हुनेश्वर बोरा यांना ' बापू जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्कार २०१९ ' जाहीर

● २०१९ विम्बल्डन स्पर्धेत बार्बोरा स्ट्रीकोवा व हसीह सु-वेई या जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले

● २०१९ विम्बल्डन स्पर्धेत गुस्ताव फर्नांडिजने पुरुष व्हीलचेयर एकेरीचे विजेतेपद पटकावले

● रितु महेश्वरी यांची नोएडा अथाॅरीटीच्या साईओ पदी नियुक्ती करण्यात आली

● गोदरेज कंज्यूमर प्रॉडक्ट्सचे सीएमओ म्हणून मेघना अप्पाराव यांची नियुक्ती करण्यात आली

● लोकसभेने राष्ट्रीय संशोधन संस्था (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● ३७ वी गोल्डन ग्लोव्ह वोजवोडिना आंतरराष्ट्रीय स्पर्धा सर्बियामध्ये आयोजित करण्यात आली

● ए के सिकरी यांची सिंगापूर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आल

● गणितज्ञ ऍलन ट्युरिंग यांचा न्यु बॅंक ऑफ इंग्लंडच्या ५० पाउंडच्या नोटेवर फोटो असेल

● इंदरपाल सिंह यांची हस्तशिल्प हॅन्डलुम निर्यात महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● नघमाना हाश्मी यांची चीनमध्ये पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली

● यादलापती रघुनाथ यांची तंबाखू मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला

● वसीम जाफर यांची श्रीलंका दौऱ्यासाठी बांगलादेश संघाच्या फलंदाजी सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली

● जागतिक बँकेने मोराक्कोला शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ५०० मिलियन डॉलर्सचे कर्ज मंजूर केले

● मानव संसाधन विकास मंत्रालयाने विदेशी विद्यार्थ्यांसाठी " स्टडी इन इंडिया " कार्यक्रम सुरु केला

● अल्जेरीयाने नायजेरियाला पराभूत करत २०१९ आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● सेनेगलने ट्युनिशियाला पराभूत करत २०१९ आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● अल्जेरीया व सेनेगल संघ २०१९ आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंजणार

● ३ दिवसीय कलिंगा साहित्य महोत्सव १९ जुलैपासून ओडीशा येथे आयोजित करण्यात येणार

● २०२० पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबर २०१९ पर्यंत नामांकन स्वीकारले जातील

● ६४ वा वार्षिक रेल्वे पुरस्कार सोहळा रांची , झारखंड येथे आयोजित करण्यात आला

● ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानावर विराजमान

● ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर

● आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानी कायम

● आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम

● ताज्या एटीपी रँकिंगमध्ये सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हीच अव्वल स्थानी कायम

● दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन झाले

● पाकिस्तानची हवाई हद्द तब्बल १४० दिवसांनंतर भारतासाठी खुली करण्यात आली

● २१ वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा १७ जुलैपासून कटक येथे आयोजित करण्यात येणार

● डॉ. प्रमोद येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

● २०२० आयएसएसएफ संयुक्त वर्ल्ड कप नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार

● आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत इलावेनिल वालारिवनने १० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत मेहुली घोषने १० मीटर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक पटकावले

● आयएसएसएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने १० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा जकार्ता येथे आयोजित करण्यात आली

● घाना , गुयाना , पाकिस्तान या देशांनी २१ व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेतुन माघार घेतली

● आरबीआयने स्टेट बँक ऑफ इंडियावर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ७ कोटींचा दंड ठोठावला .

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...