Friday, 19 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ११ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
११ जुलै २०१९ .

● ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिवस

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्युझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत केले

● न्युझीलंड संघ सलग दुसऱ्यांदा आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

● २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहीत शर्मा भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला ( ९ सामने : ६४८ धावा )

● आज २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना रंगणार

● राँजर फेडरर २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● नोव्हाक जोकोव्हीच २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान २२ जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

● विम्बल्डन स्पर्धेत १०० विजय मिळवणारा फेडरर हा जगातला पहिला टेनिसपटू ठरला आहे

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ६४ किलो वजनी गटात राखी हल्दरने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ५९ किलो वजनी गटात देविंदर कौरने सुवर्णपदक पटकावले

● बांगलादेश क्रिकेट मंडळाने मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह ऱ्होड्स यांना पदावरून हटविले

● जन धन बँक खात्यांतील ठेवींचा आकडा आता १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे

● ताजिकिस्तानने इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● सेनेगल आणि नायजेरियाने २०१९आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

● ११ व्या आशियान शालेय स्पर्धेचे आयोजन १७ जुलैपासून इंडोनेशियामध्ये करण्यात येणार आहे

● २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारताने पावरप्लेमधील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या २४/४ नोंदवली

● मध्यप्रदेश सरकारने मत्स्यपालन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी १३२ कोटींचा निधी मंजूर केला

● २०२७ पर्यंत भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल : यूएन अहवाल

● संशोधन सहकार्यासाठी प्रसार भारती आणि आयआयटी कानपूर यांच्यात सामंजस्य करार झाला

● श्रीलंका सरकाराने ३९ देशांसाठी " व्हिसा आॅन अरायवल " कार्यक्रम पुन्हा सुरु केला

● आचारसंहिता भंग केल्यामुळे अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आफताब आलमवर १ वर्षाची बंदी घालण्यात आली

● देविका सेठी लिखित " War Over Words : Censorship in India , 1930-1960 " पुस्तक प्रकाशित

● जगातील सर्वात महाग कार्यालयीन स्थानांच्या यादीत सेंट्रल डिस्ट्रीक्ट , हाँगकाँग अव्वल स्थानी

● जगातील सर्वात महाग कार्यालयीन स्थानांच्या यादीत कनॉट प्लेस , नवी दिल्ली ९ व्या क्रमांकावर

● अंडर-१९ पुरुष युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा २९ जुलैपासून इटलीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे

● चौथी जागतिक योग चॅम्पियनशिप स्पर्धा बुल्गारिया , सोफिया येथे पार पडली

● चौथ्या जागतिक योग चॅम्पियनशिप स्पर्धेत पॅरा खेळाडू तोरन यादवने ३ पदके जिंकली

● गॅस अथाॅरीटी ऑफ इंडियाने सोनिलिववर पर्यावरणावर आधारित वेब सिरीज " हवा बदले हसु " सुरु केली

● लेसेटजा कगांयागो यांची दक्षिण आफ्रिकेच्या सेन्ट्रल बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली

● ए के सिंह यांना सीबीआयचे विशेष संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले

● सुरेश अरोरा यांची पंजाबचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली

● कुरसिस्तान प्रादेशिक सरकारचे नवीन पंतप्रधान म्हणून मसरोर बर्झानी यांची निवड करण्यात आली

● जुलै ११ ते १४ जुलैपर्यंत बेंगलुरूमध्ये विधानसभा परीसरात कलम १४४ लागु करण्यात आले

● अबुधाबी २०२० मध्ये वर्ल्ड फ्यूचर एनर्जी परिषदेचे आयोजन करणार आहे

● १८ वी फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वचषक २६ ऑक्टोबरपासून ब्राझिलमध्ये आयोजित करण्यात येणार

● आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाची ५७७ वी बैठक नवी दिल्ली येथे पार पडली

● अरुण बोथरा यांनी कॅपिटल रीजन अर्बन ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला

● केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला ऑर्गनाइज्ड ग्रुप 'अ' दर्जा मंजूर केला

● केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतर-राज्य नदी जल विवाद (दुरुस्ती) विधेयक , २०१९ मंजूर केले

● प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली

● केंद्रीय मंत्रिमंडळाने " सिख फॉर जस्टिस " या संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला

● नलिन सिंघल यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडे सीएमडी म्हणून पदभार स्वीकारला

● आंध्रप्रदेश सरकारने कंपन्यांच्या फास्ट ट्रॅक मंजूरीसाठी " वन स्टॉप पोर्टल " सुरू केले

● ए के जयस्वाल यांची आयकर सेटलमेंट कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली .

No comments:

Post a Comment