Tuesday, 30 July 2019

धरण पाणी आवक जावक माप बघा किती पाणी येते जाते माहिती आहे का ?

*1) TMC म्हणजे काय ?*
*2) Cusec म्हणजे काय ?*
*3) Cumec  म्हणजे काय ?*

*उत्तर*👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणं भरत आहेत, काही धरणातून पाणी सोडल्या जात आहे.

इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो.
याचा नेमका अर्थ काय?

आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.

१) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.

01 tmc = 28,316,846,592 litres

२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.

३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.

उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.

याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ०५ धरणे 👇

१)उजनी ११७.२७ tmc
२)कोयना १०५.२७ tmc
३)जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
४)पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
५)पूर्णा येलदरी २८.५६ tmc

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] =
१०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] =
४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 1 जानेवारी 2025

1) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ठरले आहेत. 2) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात ममता बॅन...