Friday, 21 June 2024

रघुनाथ धोंडो कर्वे

✅ रघुनाथ धोंडो कर्वे ✅

✅  (जानेवारी १४, इ.स. १८८२ - ऑक्टोबर १४, इ.स. १९५३)

✅ हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते.

✅ हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होत.

✅बालपण आणि तारुण्य ✅

र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली.

 इ.स. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४०च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.. इ.स. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी या मुलाखतींमध्ये नोंदविल्या आहेत.

 याशिवाय अण्णांशी त्यांचे संबंध कसे राहिले, यावरही या मुलाखतींमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. आणखी काही दुर्मिळ माहितीही तिथे निश्चितच मिळते.

इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत.

✅संततिनियमन: रघुनाथ धोंडो कर्वे ✅

संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले.

 वाचनाची अफाट गोडी आणि लहानपणापासून जडलेली अवांतर वाचनाची सवय यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयांतून आणून वाचली.

स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले.

नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली.

स्वत:ला एकही मूल नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व त्यांच्या बायकोनेही त्याला थोर मनाने संमती दिली.

इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले.


  •  स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या दशकात धरला होता. लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे मानसिक विकृतीनिर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...