Wednesday, 31 July 2019

📚 *चालू घडामोडी (31/07/2019)* 📚


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *मुस्लिम महिला अधिकार संरक्षण(तिहेरी तलाक) विधेयक 2018 राज्यसभेत मंजूर*

◆ लोकसभेत 303  विरुद्ध 82 मतांनी मंजूर (25 जुलै 2019)

◆ राज्यसभेत 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर (30 जुलै 2019)

◆ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेत झाले मंजूर

◆ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार. 

◆ तत्काळ तिहेरी तलाकविरोधातील विधेयकाच्या बाजूने 99 तर विरोधात 84 मते पडली.

◆ तत्काळ तिहेरी तलाक बंदी करणारा भारत जगातला 21 वा देश ठरला.

● इजिप्त, सुदान, श्रीलंका, इराक, सायप्रस, जॉर्डन, अल्जेरिया, इराण, ब्रुनेई, मोरोक्को, कतार, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश,पाकिस्तानातही तिहेरी तलाकवर बंदी आहे.
https://t.me/TargetMpscMh
★ तिहेरी तलाक ?

◆ ' तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची आहे.हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.

★ मुस्लिम महिला अधिकार संरक्षण (तिहेरी तलाक) विधेयक 2018 तरतुदी

1.तत्काळ तिहेरी तलाक देणाऱ्यांना पोलीस तातडीने अटक करु शकतात, मात्र त्यासाठी स्वतः महिलेने तक्रार करायला हवी.

2.महिलेच्या रक्ताचे नातेवाईकही तक्रार दाखल करु शकतात, परंतु शेजारी -किंवा अनोळखी व्यक्तींना तक्रार करता येणार नाही.

3. तोंडी, लेखी, व्हॉट्सअ‍ॅपवर तलाक देणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

4.पीडित महिलेची बाजू ऐकल्यानंतर आरोपीला तात्काळ जामीन दिला जाऊ शकतो.

5.महिलेने तयारी दर्शवली तर मॅजिस्ट्रेट समजुतीने प्रकरण सोडवण्याची मुभा देतील.

6. पीडित महिला पोटगी मागू शकते.

7.पीडित महिलेला किती नुकसान भरपाई द्यावी हे न्यायालयातील सुनावणीनंतर निश्चित केले जाईल.

8. पीडितेची मुलंअज्ञान असतील तर त्यांची कस्टडी कोणाकडे असेल? हे न्यायाधीश ठरवतील.

9. पतीस 3 वर्ष कैद व दंड

10. तलाकपीडित स्त्री व अपत्यांसाठी निर्वाह भत्यास पात्र

11. 19 सप्टेंबर 2018 पासून जम्मू अँड काश्मीर वगळता भारतभर लागू

12. गुन्हा अजामीनपात्र मात्र, दंडाधिकारी जामीन देऊ शकणार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास
पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता*
        
◆ मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

◆ मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प हा मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा प्रस्तावित अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड) दरम्यान 117.50 कि.मी. अंतरासाठी राबविला जाणार आहे. सुमारे 70 हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

◆ विशेष म्हणजे, अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रस्तावित गती 496 किमी प्रतितास अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते मुंबई यामधील प्रवासाचा कालावधी फक्त 23 मिनिटांचा होणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...