Wednesday, 24 July 2019

चालू घडामोडी (24/07/2019)


▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *हिमा दास:- महिन्याभरात पटकावली ५ सुवर्ण*

◆ 'ढिंग एक्स्प्रेस' नावाने प्रसिद्ध असलेली भारताची स्टार धावपटू हिमा दास 

◆ हिमाने चेक रिपब्लिक येथील "मेटूजी ग्रँड प्रिक्स अॅथलेटिक्स" स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.

◆ तीने हे अंतर ५२.०९ सेकंदात पार केले.

◆ हिमाने या महिन्यात पटकावलेले हे पाचवे सुवर्ण आहे.

★हिमा दासचा यापूर्वीचा 'सुवर्ण चौकार'*

◆ 2 जुलै 2019:- पोझनन अथेलेटिक्स , पोलंड - 200 मीटर धावणे - सुवर्णपदक

◆ 7 जुलै 2019:- कुत्नो अथेलेटिक्स , पोलंड - 200 मीटर धावणे - सुवर्णपदक

◆ 13 जुलै 2019-क्लादनो अथेलेटिक्स , चेक प्रजासत्ताक, 200 मीटर धावणे - सुवर्णपदक

◆ 17 जुलै 2019- टाबोर अथेलेटिक्स , चेक प्रजासत्ताक - 200 मीटर धावणे , सुवर्णपदक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 6 नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या.*

◆ राज्य /   सध्याचे राज्यपाल /   नवे राज्यपाल

1) उत्तर प्रदेश - राम नाईक - आनंदीबेन पटेल
  
2) पश्चिम बंगाल - केसरीनाथ त्रिपाठी - जगदीप धनखड़

3) मध्य प्रदेश - आनंदीबेन पटेल - लालजी टंडन

4) बिहार- लालजी टंडन - फगु चौहान

5) त्रिपुरा - कप्तान सिंह सोलंकी - रमेश बैस

6) नागालँड - पद्मनाभ आचार्य - आर. एन. रवी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *मुकुंद नरवणे लष्कराचे नवे उपप्रमुख* #Appointment

◆ केंद्र सरकारने लष्करात नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापदी नियुक्ती झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहेत.

◆ तर सध्या पूर्व कमांडचे प्रमुख असलेले नरवणे लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. अंबू हे 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत.

◆ तसेच नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. रावत हे 31 जानेवारीला निवृत्त होत आहेत

◆ लेफ्टनंट जनरल नरवणे हे जून 1980 रोजी ते लष्कराच्या 7व्या शीख बटालियनमध्ये रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये काम केले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *जाणून घ्या देशातील प्रदूषित आणि औद्योगिक शहरांची यादी *

◆ देशातील सर्वात प्रदूषित आणि औद्योगिक शहरांची यादी राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) प्रदूषण नियमन मंडळाने केली जाहीर 

◆ देशात सर्वाधिक प्रदूषित शहरे : तारापूर, दिल्ली, मथुरा, कानपूर, वडोदरा, मुरादाबाद, वाराणसी, बुलंद  गुडगाँव, मनाली.

★ राज्यातील 'टॉप 5' :

◆ चंद्रपूर (75 सीपी) I
◆ तारापूर (72 सीपी) I
◆ डोंबिवली (62 सीपी) I
◆ नाशिक (56.50 सीपी) I
◆ नवी मुंबई (56 सीपी)

★ प्रदूषण निर्देशांक कसा ठरतो?

◆ केंद्रीय व राज्य स्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय परीक्षण समिती यांच्या माध्यमातून औद्योगिक परिसरांमध्ये असलेल्या प्रदूषणकारी घटकांचे गुणधर्म, प्रदूषणामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांची संख्या तसेच उच्च धोका घटकांचा समावेश यांच्या धर्तीवर प्रदूषण निर्देशांक ठरवण्यात येतो.

★ निकष काय? :

◆ प्रदूषित : 70 सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांकांच्या आतील
◆  अत्यंत प्रदूषित : 60-70 सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांक
◆ घातक प्रदूषित : 70 च्या वर सर्वंकष पर्यावरण प्रदूषण निर्देशांक असल्यास
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...