२८ जून २०१९

चालु घडामोडी वन लाईनर्स , २८ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२८ जून २०१९ .

● १४ वी जी-२० परिषद ओसाका , जपान येथे आयोजित करण्यात आली

● जी-२० परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली

● आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा पुर्ण करणारा विराट कोहली सर्वात जलद फलंदाज ( ४१९ डाव )

● आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा पुर्ण करणारा विराट कोहली १२ वा खेळाडू ठरला आहे

● आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा पुर्ण करणारा विराट कोहली तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे

● विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद २५ बळी टीपण्याचा विक्रम मोहम्मद शमी ने आपल्या नावावर केला ( ९ सामने )

● विश्वचषक स्पर्धेत सलग ४ अर्धशतक झळकावणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे

● २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी विजय मिळवला

● वनडेमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत एम एस धोनी तिसऱ्या स्थानी ( ७२ अर्धशतके )

● २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये स्केट बोर्ड , सर्फिंग आणि स्पोर्ट क्लीम्बिंग सामील केले जातील

● २०२४ मध्ये पॅरीस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धात ब्रेक डान्स सामील केला जाणार आहे

● २०२० कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना कोलंबिया मध्ये आयोजित करण्यात येणार

● इंग्लंड संघाने महिला फिफा विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

● भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे सीएमडी म्हणून डॉ. नवीन सिंंघल यांची नियुक्ती करण्यात आली

● बी एस बिश्नोई यांची भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली

● राजीव गांधी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलपती म्हणून के सी रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली

● झांग हैइफेंगने यांची आशियाई बॉडीबिल्डिंग फिटनेस संघटनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● आरबीआयने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गोमती नागरी सहकारी बँकेवर २ लाख रुपयांचा दंड ठोठावला

● जागतिक बँकेकडून श्रीलंकेला पुराचा धोका कमी करण्यासाठी ३१० दक्षलक्ष डाॅलर्सची मदत देण्यात आली

● भारतीय उद्योगपती सायरस पूनवाला यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून मानद पदवी प्रदान करण्यात आली

● गायक राहत फतेह अली खान यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून मानद पदवी प्रदान करण्यात आली

● कोरी गॉफ (१५) विंम्बलडन स्पर्धेसाठी पात्र ठरणारी सर्वात तरुण टेनिसपटू ठरली आहे

● आदिवासी हस्तशिल्प , नैसर्गिक उत्पादनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने " गो ट्राइबल " मोहीम सुरू केली

● आंध्रप्रदेशात आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी जागतिक बँकने ३२८ दक्षलक्ष डाॅलर्सचे कर्ज मंजूर केले

● राजस्थान राजमार्ग विकासासाठी जागतिक बँकने २५० दक्षलक्ष डाॅलर्सचे कर्ज मंजूर केले

● जागतिक बँकने भारताला क्षयरोगाच्या निर्मुलनासाठी ४०० दक्षलक्ष डाॅलर्सचे कर्ज मंजूर केले

● भारताने परमाणु सक्षम मिसाईल " पृथ्वी - २ " ची यशस्वीरित्या चाचणी केली

● युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे ब्रॅड अॅम्बेसेडर म्हणून ताकीमी काझो यांची नियुक्ती करण्यात आली

● ब्राझील संघ २०१९ कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● कॅबिनेटने राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमासाठी १३३४३ कोटी रुपये मंजूर केले

● २३ वा सिंधु दर्शन महोत्सव सिंधू घाट , लेह येथे आयोजित करण्यात आला

● रशियाने युरोपियन युनियन मधुन आयात होणाऱ्या खाद्य पदार्थांवरील बंदी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली

● गुजरात सरकारने पुढील २ वर्षात ३०० सीएनजी पंप जोडण्यासाठी सीएनजी सहभागी योजनेची घोषणा केली

● भाजपा खासदार मिनाक्षी लेखी लिखित कादंबरी " The New Delhi Conspiracy " लवकरच प्रकाशित होणार

● होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) विधेयक , २०१९ लोकसभेत मंजूर झाले

● नॅशनल हाउसिंग बँकचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून एस कुमार होटा यांची नियुक्ती करण्यात आली

● अरुणाचल प्रदेश लोकायुक्त अध्यक्षपदी पी. के. साइकिया यांची नियुक्ती करण्यात आली

● डाॅ जयदीप आर्य यांची योग परिषद हरियाणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● तेलंगाना सरकारचे सल्लागार म्हणून पत्रकार टी अशोक यांची नियुक्ती करण्यात आली

● भारत - नेपाळ आर्थिक भागीदारी शिखर बैठक गंगटोक , सिक्किम येथे आयोजित करण्यात येणार

● सनथ कुमार यांची पुन्हा दोन हंगामासाठी बडोदा क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● यतींद्र मरळकर यांची गोवा लोकसेवा आयोगाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली

● याशुहिरो यामाशिता यांची जपानच्या ओलंपिक समितीचे अध्यक्ष म्हणून  नियुक्ती करण्यात आली

● रजनिकांत सिंह यांची ओडिशा विधानसभेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...