Sunday, 17 October 2021

दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान


― ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.

― ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

― आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

― ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.

― मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.

― माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.

― डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.

― मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

― इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

― ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

― तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...