●
- भारत सरकार कायदा 1935 नुसार 1937 मध्ये विधानपरिषद अस्तित्वात आली.
- परीषदेची पहिली बैठक 20 जुलै 1937 रोजी पुण्याच्या कौन्सिल हाॅलमध्ये पार पडली.
- 1960 पासून हिवाळी अधिवेशन (ऑक्टो नोव्हें) नागपूर येथे होते.
- 1987 मध्ये परीषदेला 50 वर्षे पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
- 2000 पासून 22 जुलै हा दिवस महाराष्ट्र विधानपरिषदेचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.
---------------------------------------
● सदस्य संख्या
- 1937 मध्ये 29, 1957 मध्ये 108 करण्यात आली तर वेगळ्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही सदस्य संख्या 78 करण्यात आली. यापैकी -
30 सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे
22 सदस्य स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे
07 सदस्य पदवीधर आणि शिक्षकांद्वारे
12 सदस्य राज्यपालांद्वारे निवडले जातात.
- गणपूर्तीसाठी कमीत कमी 10 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे.
--------------------------------------
● सभापती
- पहिले सभापती: मंगलदास मच्छाराम पक्वासा (22 जुलै 1937 ते 16 ऑगस्ट 1947)
- सध्या: रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर
- आजपर्यंत एकही महिला सभापती झाली नाही.
----------------------------------------
● उपसभापती
- पहिले उपसभापती: आर. जी. सोमण (22 जुलै 1937 ते 16 ऑक्टोबर 1947)
- पहिल्या महिला उपसभापती: जे. टी. सिपाहिमलानी (19 ऑगस्ट 1955 ते 24 एप्रिल 1962)
- सध्या: नीलम गोर्हे
No comments:
Post a Comment