Wednesday, 26 June 2019

हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते

🌸🌸हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते🌸🌸

✍हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होउ नये म्हणून बंदिस्त असते व उबदार असते.

✍हे घर काचेचे असून घरात ऊन येण्यास व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो.

✍आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात वापरतात.

✍काही वायूंच्या रेणूंची रचना अश्या प्रकारची असते की ते उष्णतेच्या ऊर्जालहरी परावर्तित करू शकतात.

1.कार्बन डायॉक्साईड,
2.मिथेन,
3.डायनायट्रोजन ऑक्साईड व
4.पाण्याची वाफ हे प्रमुख वायु असे आहेत जे या उर्जालहरी परावर्तित करू शकतात.

✍सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेत अतिनील ते अवरक्त अशा ऊर्जालहरींचा समावेश असतो, त्यापैकी अवरक्त किंवा इन्फ्रारेड ऊर्जा लहरी म्हणजे उष्णतेच्या लहरी.

✍पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशातील सर्व ऊर्जा लहरी दिवसा भुपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते.

No comments:

Post a Comment