Saturday, 29 January 2022

छत्रपती शाहू महाराज

✍26 जून सामाजिक न्याय दिन

आपल्या कृतीतून सामाजिक समतेचा संदेश देणारे लोकोत्तर महाराज राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते.

●मूळ नाव : यशवंतराव , वडिलांचे नाव-जयसिंगराव घाटगे ,आईचे नाव –राधाबाई
 
●जन्म :२६ जून१८७४,कागल ,कोल्हापूर

●राज्याभिषेक : २ एप्रिल १८९४ रोजी वयाच्या २० व्या वर्षी.

●मृत्यू : ६ में १९२२ मुंबई

कार्ये:
● १८९५ - शाहूपुरी गुळाची बाजारपेठ स्थापन .

●२६ जुलै १९०२- रोजी एक आदेश संमत करून शासकीय सेवेत ब्राह्मणेतरांना ५०%जागा राखीव ठेवल्या .

●१९०६ -कोल्हापूर येथे शाहू मिल ची स्थापना.

●१९०८ -भोगावती नदीवर राधानगरी नावाचे धरण बांधले.

●१९११- मध्ये कोल्हापुरात सत्येशोधक समाजाच्या चळवळीचे पुनरुज्जीवन करून तिचे नेतृत्व केले ,१९१३ मध्ये सत्यशोधक       विद्यालय स्थापन.

● १९१२ -नवी कृषी  तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅूग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’  संस्था कोल्हापुरात स्थापन .

● १९१३- मध्ये महाराजांनी संस्थानातील प्रत्येक खेड्यात शाळा असावी असा आदेश काढला.१९१८ मध्ये त्यांनी आणखी एक आदेश काढून  कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

● इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.

● १९१८ - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत.
-संस्थानात आर्ये समाजाची स्थापना केली व  राजाराम college,राजाराम विद्यालय ,ट्रेनिंग कॉलेज यांची जबाबदारी आर्ये        समाजावर सोपवली
-कनिष्टजातींना त्रासदायक ठरणारी बलुता पद्धती नष्ट केली .
-कुलकर्णी वतनाचे उच्चाटन करून त्यावर पगारी तलाठ्याची नेमणूक केली .

●१९१९- संस्थानात अस्पृशतापालनास बंदी घातली.
-१३व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष(कानपूर,एप्रिल१९१९ ),कानपूरच्या जनतेने त्याना”राजर्षी”पदवी दिली .

●१९२० –भावनगर(गुजरात ) येथे आर्यधर्म परिषदेचे अध्यक्षस्थान राजांनी भूषविले .
            - हुबळी येतील सामाजिक परिषदेचे अध्यक्ष .

●इतर कार्ये ;
            -डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक ‘ व आगरकरांच्या ‘सुधारक ‘वृत्तपत्रांना आर्थिक साहाय्य.

           -व्हेलेंटीन चिरोल यांच्या ‘Unrest In India’ या ग्रंथाचे भाषांतर रा .र .डोंगरे यांच्या कडून करवून घेतले .

●१९०२ –केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने L.L.D पदवी दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...