२९ जून २०१९

चालु घडामोडी वन लाईनर्स , २९ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२९ जून २०१९ .

● २९ जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिन

● संकल्पना २०१९ : " Sustainable Development Goals "

● २९ जून : International Day Of The Tropics

● जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ ६ महिन्यांसाठी वाढवण्यात आला

● सौदी अरेबियाकडून भारतीयांच्या हज कोट्यात ३० हजारांची वाढ करण्यात आली आहे

● केंद्र सरकार लवकरच " एक देश एक रेशन " कार्ड ही योजना राबवणार

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिक आफ्रिकेने श्रीलंकेला ९ गडी राखून पराभूत केले

● ३० जून रोजी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले

● ‘ स्टार्टअप इंडिया ’ योजनेंतर्गत गेल्या ४ वर्षात सर्वाधिक ३ हजार ६६१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी महाराष्ट्रात झाली

● २८ ते ३० जून दरम्यान १२ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार

● गोवा मराठी चित्रपट महोत्सवातर्फे दिला जाणारा कृतज्ञता पुरस्कार सुमित्रा भावे यांना प्रदान

● ३ दिवसीय मॉन्सून बीज महोत्सव म्हैसूर , कर्नाटक येथे २८ ते ३० जून दरम्यान आयोजित करण्यात येणार

● रेल्वेत ९ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे , यामध्ये महिलांसाठी ५० % जागा राखीव

● रामविलास पासवान यांची बिहार विधानसभेतून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली

● बिजू जनता दलाचे अमर पटनायक व सस्मित पात्रा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली

● इजिप्तसोबत संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने भारताची युद्धनौका आयएनएस " तरकश " इजिप्तमध्ये दाखल

● जम्मू काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना ३ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडला

● अमेरिकेने २०१९ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला

● भारतीय संघाने एशियन टीम स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

● कुसानोव्ह मेमोरियल टूर्नामेंट २०१९ मधून द्युती चंदने माघार घेतली

● के. शनमुगम यांची तमिळनाडूचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली

● जे.के. त्रिपाठी यांची तमिळनाडूचे पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● २०१८ मध्ये १.४ दशलक्ष भारतीय पर्यटकांनी अमेरिकेला भेट दिली : अहवाल

● दीप्ती शर्मा किया सुपर लीगमध्ये खेळणारी चौथी भारतीय खेळाडू ठरली आहे

● राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा सोनीपत येथे आयोजित करण्यात आली

● नॅशनल रैंकिंग टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मानव ठक्कर ने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले

● नॅशनल रैंकिंग टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत प्राप्ती सेन ने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले

● चिलीने कोलंबियाला ५-४ ने पराभूत करत कोपा अमेरिका स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली

● अर्जेंटिनाने व्हेनेझुएला ला २-० ने पराभूत करत कोपा अमेरिका स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली

● पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुढच्या महिन्यात अमेरिकेला भेट देणार

● भारतीय वंशाच्या प्रिया सेरराव ने " मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया " किताब पटकावला

● एअरटेलने कोलकाता , पश्चिम बंगाल मध्ये ३ जी नेटवर्क बंद करणार असल्याचे जाहीर केले

● भारताचे परकीय चलन भांडवल जून २०१९ च्या अखेरीस ४२६ अब्ज डॉलर्सवर पोहचले

● सेबॅस्टियन कोय यांची आंतरराष्ट्रीय एथलेटिक्स फेडरेशन संघटनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली

● जनरल अॅडम मोहम्मद यांची इथियोपिया आर्मी फोर्सचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली

● सौदी अरेबिया २०२० मध्ये जी-२० शिखर परिषद आयोजित करणार

● रशिया २०२० मध्ये ब्रिक्स संमेलन आयोजित करणार

● महाराजा रणजितसिंह यांच्या १८० व्या पुण्यतिथीनिमित्त लाहोर येथे महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार

● सेंट पीटर्स युथ सेंटर ओपन हॉकी स्पर्धेत सेंट्रल रेल्वेने महिलांचे विजेतेपद पटकावले

● सेंट पीटर्स युथ सेंटर ओपन हॉकी स्पर्धेत युनियन बँक ऑफ इंडियाने पुरुषांचे विजेतेपद पटकावले

● सरकारने लहान बचत योजनांवरील व्याज दर ०.१ टक्क्यांने कमी केला

● २४ वा युरोपियन युनियन फिल्म महोत्सव २०१९ नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला

● स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने पालकांना व प्रशिक्षकांना शुटिंग रेंजमध्ये बंदी घालणारा विवादित आदेश मागे घेतला

● भारतातील पहिली शाकाहार परीषद ७ ते ८ जुलै दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार

● आयआयटी कानपूरकडून बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना मानद डॉक्टरेट प्रदान

● हैदराबाद मध्ये २०१९ जागतिक डिझाइन असेंब्ली आयोजित करण्यात येणार

● २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची बैठक अथेन्स शहरात आयोजित करण्यात येणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...