(ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८)
हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.
अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.
रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते.
सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.
त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.
❇️महात्मा गांधी : विकिपीडिया ❇️
जन्म:
ऑक्टोबर २, इ.स. १८६९
पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत
मृत्यू:
जानेवारी ३०, इ.स. १९४८
नवी दिल्ली,
भारतचळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:
अखिल भारतीय काँग्रेस
पुरस्कार:
टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती, Order of the Companions of O. R. Tambo
प्रमुख स्मारके:राजघाट
धर्म:हिंदू
प्रभाव:लिओ टॉलस्टॉय
जॉन रस्किन
गोपाळ कृष्ण गोखले
पत्नी:कस्तुरबा गांधी
अपत्ये:हरीलाल
मणिलाल
रामदास
देवदास
No comments:
Post a Comment