Tuesday, 4 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०४ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०४ जून २०१९ .
● ०४ जून : International Day Of Innocent Children Victims Of Aggression 
● दिल्ली परिवहन मंडळाच्या बस , क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार
● परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भाजपा आता गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे
● आयसीसी २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने इंग्लंडला १४ धावांनी पराभूत केले
● केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वीकारला पदभार
● केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री म्हणून व्ही. के. सिंह यांनी स्वीकारला पदभार
● केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री म्हणून अर्जुन मुंडा यांनी स्वीकारला पदभार
● ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो : आयएचएस मार्केट
● २०२५ पर्यंत भारत जपानलाही मागे सोडून आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : आयएचएस मार्केट
● २०१९-२३ दरम्यान जीडीपी सरासरी वाढ ही ७% राहणार आहे : आयएचएस मार्केट
● ३० वी फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा पूदूचेरी येथे आयोजित करण्यात आली
● महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ३० व्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● महाराष्ट्राच्या महिला संघाने ३० व्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● नोव्हाक जोकोव्हीच फ्रेंच ओपन टेनिस टूर्नामेंट २०१९ च्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल
● मध्यप्रदेश सरकारने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली
● स्पेनचा फुटबॉलपटू ३५ वर्षीय जोश रियेसचे अपघातात निधन झाले
● राज्यसभा अधिवेशनाचा प्रारंभ २० जूनपासून होणार आहे
● भारतीय हवाई दलाचे ' एएन-32 ' विमान आसामच्या जोरहाट हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर बेपत्ता झाले
● अजित डोभाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली
● अजित डोभाल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली
● जगातील सर्वाधिक १५ उष्ण शहरांपैकी १० शहरं ही भारतात आहेत : एल डोराडो वेदर
● अभिनेत्री , गायिका रुमा गुहा ठाकुरता (वय ८४) यांचे निधन झाले
● रामदास आठवले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला
● संजय धोत्रे यांनी दूरसंचार विभागाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला
● आंतरजातीय विवाह प्रोत्साहन रक्कम व विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करणार असल्याची घोषणा करण्यात आली
● गैरहिंदी भाषिक राज्यांमध्ये आता हिंदी भाषा शिकविणे अनिवार्य नाही : केद्र सरकार
● आंध्रप्रदेश सरकारने आशा कामगारांचे वेतन ७ हजार रुपयांनी वाढवून १० हजार रुपये केले
● आसाम सरकारने पंचायत प्रमुखासाठी किमान वय ३५ वर्षांवरुन कमी करुन २५ वर्ष केले
● कस्तुरिरंगन समितीने मानव संसाधन मंत्रालयाला नवीन शैक्षणिक धोरण सादर केले
● जनरल इन्शुरन्स काउन्सिलचे महासचिव म्हणुन एम. एन. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली
● भाजपाचे राजेश पाटनेकर यांची गोवा विधानसभेचे सभापती म्हणून निवड करण्यात आली
● आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या ३४८ नोंदविली
● पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात मालदीव , श्रीलंका या देशांना भेट देणार आहेत
● ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०१९ चे आयोजन सिडनी येथे करण्यात आले
● उत्तर प्रदेशातील शहरी भागात बेरोजगारी दर सर्वाधिक १६% आहे : अहवाल
● मे २०१९ मध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये " गुगल पे " ने अव्वल स्थान पटकावले
● जागतिक लिंग समानता निर्देशांक २०१९ मध्ये डेन्मार्कने अव्वल स्थान पटकावले
● जागतिक लिंग समानता निर्देशांक २०१९ मध्ये भारत ९५ व्या स्थानी विराजमान
● जागतिक लिंग समानता निर्देशांक २०१९ मध्ये चीन ७४ व्या स्थानी विराजमान
● अॅपल ची वार्षिक वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स परिषद ७ जून रोजी कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात येणार
● राजीव महर्षी यांची जागतिक आरोग्य संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● आरबीआयने ऍक्सिस बँकेचे अध्यक्ष म्हणून राकेश मखीजा यांच्या नियुक्तीला मंजूरी दिली
● स्विफ्ट इंडिया व दक्षिण एशिया प्रादेशिक परिषद २०१९ मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली
● कतार २०२० व २०२१ मध्ये फिफा क्लब विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार
● भारतात इझरायलचे पर्यटन पर्यवेक्षक म्हणून सॅमी याहिया यांची नियुक्ती करण्यात आली
● अरुणाचल प्रदेश विधानसभेचे सभापती म्हणून चॅगलॅग फोसम खिमुन यांची नियुक्ती करण्यात आली
● स्विगीने घरगुती जेवण व टिफिन सेवेसाठी ' डेली अॅप ' चे अनावरण केले
● ग्रॅनाटकिन मेमोरियल फुटबॉल स्पर्धा सेंट पीटर्सबर्ग , रशिया येथे आयोजित करण्यात आली .

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...