चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१६ जून २०१९ .
१६ जून २०१९ .
● १६ जून : International Day Of Family Remittances
● १६ जून : Father's Day
● केंद्र सरकार लवकरच देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘ वन मेट्रो वन कार्ड ’ सुरू करणार
● रेल्वेत प्रवाशांना मसाज सेवा पुरवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आला
● एफआयएच हाॅकी सिरीज फायनल्स स्पर्धा भुवनेश्वर , ओडिशा येथे संपन्न
● भारताने दक्षिण आफ्रिकेला ५-१ असे पराभूत करत एफआयएच सीरीज फायनल्स हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● भारतीय संघ २०२० टोकियो ऑलिम्पिक पात्रतेच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरला आहे
● ऑपरेशन सनशाइन २ अंतर्गत भारत आणि म्यानमारच्या लष्कराने माओवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले
● सेबीने एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांच्यावर २ वर्षांची बंदी घातली
● ५६ वी फेमिना मिस इंडिया स्पर्धा २०१९ मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती
● राजस्थानच्या सुमन रावने फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावला
● सुमन राव थायलँडमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार
● ३ राज्यांतील ६ राज्यसभा जागांसाठी ५ जुलैला मतदान होणार
● १५ जून ते १५ ऑक्टोबर पर्यंत गिर राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद राहणार
● ९ दिवसीय आंतरराष्ट्रीय शिमला पुस्तक मेळा , शिमला येथे आयोजित करण्यात आला
● फिफा अंडर-२० फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पोलंड येथे आयोजित करण्यात आली
● युक्रेन ने दक्षिण कोरियाला ३-१ ने पराभूत करत फिफा अंडर-२० फुटबॉल विश्वचषक जिंकला
● भारत सुर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिले मिशन ' आदित्य-एल १ ' २०२० मध्ये लाँच करणार
● झुझाना कॅपुतोवा यांनी स्लोव्हाकियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली
● मधु सरीन यांना युनिव्हर्सिटी आॅफ अॅग्लिया कडून नागरी कायदा विषयात मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले
● ऊर्जा संक्रमण व जागतिक पर्यावरण वाढीसाठी जी-२० मंत्रीमंडळाची बैठक जपान येथे आयोजित करण्यात आली
● केंद्रीय मंत्री व्ही के सिंह ऊर्जा संक्रमण व जागतिक पर्यावरण वाढीसाठी जी-२० मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते
● रशियन शिक्षण मेळा २०१९ कोलकाता , पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात येणार
● छत्तीसगढच्या शिवानी जाधव ला ' द फेमिना मिस ग्रँड इंडिया ' ने सन्मानित करण्यात आले
● युनिसेफ प्रियंका चोप्रा ला डॅनी केये मानवीय पुरस्काराने सन्मानित करणार
● २ रा भारतीय आंतरराष्ट्रीय मेगा ट्रेड फेअर कोलकाता येथे आयोजित करण्यात आला
● भारत-इटलीची दहशतवाद विरोधी २ री बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली
● श्रीमती पद्मजा यांची तुवालु येथे भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली
● रानी जॉर्ज यांची केरळ राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती
● चीनची संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्य म्हणून निवड
● बांगलादेशची संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्य म्हणून निवड
● संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्य म्हणून निवड एकुण १८ देशांना निवडले गेले
● आशियाई विकास बँक पाकिस्तानला ३.४ बिलियन डॉलर्स देणार
● भारतीय स्क्वाश रॅकेट फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून देबेंद्रनाथ सारंगी यांची नियुक्ती करण्यात आली
● भारतीय स्क्वाश रॅकेट फेडरेशनचे महासचिव म्हणून सायरस पोन्चा यांची नियुक्ती करण्यात आली
● जम्मु कश्मीर बँकने ' प्रिमियम सेव्हिंग बँक अकाउंट ' योजनेचा शुभारंभ केला
● ६ व्या आंतरराष्ट्रीय जयपूर साहित्य महोत्सवची सुरुवात युके येथे झाली
● भारत किरगिझस्तानला २०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देणार
● एफआयएच महिला हाँकी सिरीज फायनल्स स्पर्धा हिरोशिमा , जपान येथे आयोजित करण्यात आली
● भारतीय महिला संघाने उरुग्वेला एफआयएच महिला सीरीझ फायनल्समध्ये ४-१ ने पराभूत केले
● वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्स ८ ऑगस्टपासून चीनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे
● राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज रविवारी अखेर पार पडला आहे , १३ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.
● राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला
● राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
● आशिष शेलार यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
● तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली .
No comments:
Post a Comment