Wednesday, 12 June 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १२ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१२ जून २०१९ .
● १२ जून : जागतिक बालकामगार विरोधी दिवस
● संकल्पना २०१९ : " Children shouldn’t Work In Fields , But On Dreams "
● अंतराळातील युद्धशस्त्र प्रणाली विकासासाठी " डिफेन्स रिसर्च एजन्सी (डीएसआरओ) " या नव्या संस्थेस मंजुरी
● वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या एएन-३२ विमानाचे काही अवशेष शोधपथकाला अरुणाचल येथे आढळून आले
● जागतिक तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन नेदरलँड मध्ये करण्यात आले आहे
● येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र सरकार कॅबिनेटचा विस्तार करणार
● बिहार सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या पेन्शन योजनेला राइट टू सर्व्हिस अ‍ॅक्टमध्ये समाविष्ट केले
● बिहार सरकार पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयातील एकाला शासकीय नोकरी देणार
● फोर्ब्सनं २०१९ सालच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या अव्वल शंभर जणांची यादी जाहीर केली
● फोर्ब्सनं जाहीर केलेल्या २०१९ सालच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत लिओनेल मेस्सी अव्वल
● फोर्ब्सनं जाहीर केलेल्या २०१९ सालच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो दुसऱ्या स्थानावर 
● फोर्ब्सनं जाहीर केलेल्या २०१९ सालच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत नेयमार तिसऱ्या स्थानावर
● फोर्ब्सनं जाहीर केलेल्या २०१९ सालच्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली १०० व्या स्थानावर
● येत्या ५ वर्षांत देशाच्या विविध अल्पसंख्याक समाजातील ५ कोटी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात येणार
● अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ भारत दौऱ्यावर येणार
● एनबीए स्टार टोनी पार्करने बास्केटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली
● अॅमेझॉनने गुगलला मागे टाकत अव्वल ग्लोबल ब्रँड होण्याचा मान मिळविला
● करतारपूर कॉरिडॉर प्रकल्पासाठी पाकिस्तानने 100 कोटी रुपये मंजूर केले
● ७ भारतीय-मूळ असलेल्या व्यक्तींना ऑस्ट्रेलियात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानांसाठी सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला
● आफ्रिकन देश बोत्सवानाने समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता दिली
● वायु प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुर्मान २.६ वर्षांने कमी झाले : अहवाल
● एस के शर्मा यांची भारतीय स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● आंध्रप्रदेशमधील ' डेक्कन डेवलपमेंट सोसायटी ' महिला संघटनेला संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रतिष्ठित इक्वेटर पुरस्कार २०१९ ने सन्मानित करण्यात आले
● १ जुलैपासून आरटीजीएस एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे
● यस बँकेचे स्वतंत्र कार्यकारी संचालक मुकेश सभरवाल यांनी मंडळातुन राजीनामा दिला
● शरद कुमार यांची अंतरिम केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली
● निरूपेंद्र मिश्रा यांची कॅबिनेट मंत्री दर्जासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली
● पीके मिश्रा यांची कॅबिनेट मंत्री दर्जासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली
● २०१९ किया सुपर लीगमध्ये भारतीय जेमिमा रॉड्रिग्ज यॉर्कशायर डायमंडसाठी खेळणार
● भारतीय सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे ३ आठवड्यासाठी विश्वचषक २०१९ स्पर्धेमधून बाहेर
● १२-१३ जून रोजी चक्रीवादळ " वायू " गुजरातच्या समुद्र किनार्यावर धडकणार : भारतीय हवामान विभाग
● फ्रान्स भारतातील रेल्वे स्टेशन आधुनिकीकरणासाठी ७ लाख युरो भारताला देणार
● गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून दयानंद सोपटे यांची नियुक्ती करण्यात आली
● भारत व पोर्तुगाल लोथल, गुजरात येथे राष्ट्रीय समुद्री वारसा संग्रहालय स्थापन करणार
● प्रख्यात पत्रकार ई गोपीनाथ यांचे नुकतेच निधन झाले
● आंध्रप्रदेशचे गृहमंत्री म्हणून मेकाथोटी सुचिता यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली
● दुबईमध्ये बाल अधिकारांसाठी " My Right " मोहीम सुरू करण्यात आली
● थावरचंद गहलोत यांची राज्यसभेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली
● कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची भारतीय दिवाळखोरी मंडळात पार्ट-टाइम सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली
● व्ही. रवि अंशुमन यांची सेबीचे पार्ट-टाईम सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली
● भारताचे दुसरे चंद्र मिशन चंद्रयान-२ १५ जुलै २०१९ रोजी २:५१ मिनिटांनी प्रक्षेपित केले जाणार
● व्ही एस कौमुदी यांची पोलीस संशोधन विकास विभागाचे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● त्रिपुरा सरकारचे मुख्य सचिव म्हणून यु वेंकटेश्वरू यांची नियुक्ती करण्यात आली
● भारतात चीनचे नवीन राजदूत म्हणून सन वेदॉन्ग यांची नियुक्ती करण्यात आली
● मध्यप्रदेशचे माजी मंत्री शिवनारायण मीना यांचे निधन झाले
● १६ व्या आशिया मीडिया समिटची सुरुवात कंबोडिया येथे झाली .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...