चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२८ मे २०१९ .
२८ मे २०१९ .
● 28 May : International Day Of Action For Women’s Health
● 28 May : Menstrual Hygiene Day
● Theme 2019 : " It’s Time For Action "
● महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर
● यंदा बारावीचा निकाल ८५.८८% लागला असून तो मागील वर्षापेक्षा २.५३ टक्क्यांनी घसरला आहे
● राही सरनोबत ने महिलांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
● सुवर्णपदक जिंकत राही सरनोबत २०२० टोकयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे
● सौरभ चौधरी ने पुरुषांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
● नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळयाचे BIMSTEC देशांना निमंत्रण देण्यात आले
● मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत 16 वी लोकसभा विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली
● ग्लोबल स्पोर्ट्स फॅन अॅवॉर्ड सोहळा १४ जून रोजी मँचेस्टर येथे आयोजित केला जाणार आहे
● सुधीरकुमार गौतम ला ग्लोबल स्पोर्ट्स फॅन अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
● सुकुमार कुमार ला ग्लोबल स्पोर्ट्स फॅन अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
● पाकिस्तानचे अब्दुल जलील यांना ग्लोबल स्पोर्ट्स फॅन अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
● बांगलादेशचे शोएब अली यांना ग्लोबल स्पोर्ट्स फॅन अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
● श्रीलंकेचे गायान सेनानायाके यांना ग्लोबल स्पोर्ट्स फॅन अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
● रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण 6 जून रोजी जाहीर होणार आहे
● २९ मे रोजी भाजपचे पेमा खांडू अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत
● डीआरडीओने ' आकाश-1एस ' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे
● दिग्दर्शक , निर्माते वीरू देवगण यांचे निधन झाले , ते ८५ वर्षांचे होते
● चीनमधील दूरसंचार सेवा पुरवणार्या चायना युनिकॉमने जगातील पहिले 5 जी सिमकार्ड लाँच केले
● ऑक्टोबर २०१९ मध्ये गोवा ३६ व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार आहे
● ज्ञानवंत सिंह यांना पश्चिम बंगालचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले
● संयुक्त राष्ट्रसंघाच्या गृहनिर्माण परिषदेच्या कार्यकारी मंडळावर भारताची सदस्य म्हणून निवड झाली
● आंतरराष्ट्रीय वाहतूक फोरम २०१९ शिखर बैठक जर्मनी मध्ये आयोजित करण्यात आली
● पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला ' बेस्ट स्मार्ट सिटी ' पुरस्कार प्रदान
● संयुक्त राष्ट्रसंघाच्या गृहनिर्माण परिषदेचे पहिले सत्र नैरोबी , केनिया येथे आयोजित करण्यात आले
● संयुक्त राष्ट्रसंघाने निरंतर विकास लक्ष - १६ साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामाजिक कार्यकर्ते काजोलोवेका यांची नियुक्ती केली
● भारतीय क्रिकेटपटू रोहीत शर्मा फोर्ब्स इंडिया पहिल्या स्पोर्ट स्पेशल एडिशन मॅगझिनच्या कवर पेजवर झळकला
● माउंट एव्हरेस्टवर स्वच्छता मोहीमे अंतर्गत आतापर्यंत ११ टन कचरा गोळा करण्यात आला आहे
● ओडिशा सरकार ५ वर्षासाठी भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाला प्रायोजित ( Sponsor ) करणार
● जपानच्या नवीन सम्राटांना भेटणारे डोनाल्ड ट्रम्प जागतिक स्तरावरील पहिले नेते बनले
● युरोपियन पीपल्स पार्टीने युरोपियन संसदेची निवडणूक २०१९ जिंकली
● पश्चिम बंगालचे नवीन गृहसचिव म्हणून आलपन बंडोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली
● व्यावसायिक टेनिस रेजिस्ट्रीचे संचालक म्हणून दिलीप मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली
● प्राध्यापक सबू थॉमस यांची महात्मा गांधी विद्यापीठाचे उपकुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आली
● पीटर मुथारिका यांची मालावीचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली
● ब्रिटिश-भारतीय दिनेश धमीजा यांची युरोपीय संसदेचे सदस्य म्हणून निवड झाली
● इंडिया रेटींग्स ने २०१९ साली भारताचा वृद्धीदर ६.९% एवढा असण्याची शक्यता वर्तवली आहे
● श्रीलंकेच्या गुणरत्ने यांना त्यांच्या उपन्यास " In Our Mad And Furious City '' साठी आंतरराष्ट्रीय डायलन थॉमस पुरस्कार प्रदान
● प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) ची आंतर सत्रीय बैठक थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली
● वैदेही विजयकुमार यांची मदर तेरेसा महिला विद्यापीठाच्या उपकुलपती पदी नियुक्ती
● रवींद्र सेनगावकर यांची मुंबई रेल्वेचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली
● अंकुश शिंदे यांची सोलापुरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
● अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय निवडणूक आयुक्त म्हणून संयुक्त राष्ट्रासंघाने चार्लोट ओसेई यांची नियुक्ती केली
● गाझियाबादच्या सागर कसाना ने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले
● कर्नाटक कॅबिनेटकडून क्लाउड सीडिंग प्रोग्रामला मान्यता देण्यात आली .
No comments:
Post a Comment